आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये घटस्फोट रोखण्याचा व्यवसाय तेजीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगावर रुबाबदार सूट, हातात चांदीचे घड्याळ व ओठात उंची िसगारेट ठेवणारे यू फेंग यांची जीवनशैली एका अर्थाने चीनच्या कौटुंबिक मूल्यांकडे पाहता विरोधाभासी आहे. त्यांचे ऑफिस प. चीनच्या चोंगकिंग या शहरात आहे. हे ऑफिस एखाद्या मोठ्या डायनिंग रूमसारखे वाटते. करड्या रंगाचा सोफा, क्रीम रंगाचे पडदे व मोठ्या खिडकीतून दिसणाऱ्या आसपासच्या उंचच उंच इमारती असे वर्णन त्यांच्या ऑफिसचे करता येईल. त्यांच्या ऑफिसमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते, कारण त्यांना आपले लग्न वाचवायचे आहे. आपल्या नवऱ्याचे ज्या महिलेशी संबंध आहेत तिच्यापासून आपल्या नवऱ्याचे त्यांना संरक्षण करायचे आहे.

२००७ पूर्वी यू फेंग सर्वसामान्य वकिली करत होते, पण नंतर त्यांनी विवाह समुपदेशनाचे काम सुरू केले. त्यांची वकिली फी १ लाख ते ५ लाख युआन (१५ ते ७५ हजार डॉलर) एवढी असून साधारण एक केस संपवण्यासाठी त्यांना ७-८ महिने लागतात. यू फेंग आपल्या अशिलाचा नवरा व नवऱ्याचे संबंध असलेली महिला यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करतात.

हळूहळू या दोघांच्या संबंधातील खोलपणा जाणून घेऊन ते नवऱ्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देतात. यू फेंग यांच्याकडे येणारे अशील साधारण ३० ते ४० वयोगटातील आहेत. ही पिढी ‘आवडलं तर विकत घ्या किंवा त्याला मिळवा’ अशा मानसिकतेची आहे, असे फेंग सांगतात. वाढते लैंगिक संबंध (सेक्स) चीनमध्ये आलेल्या चंगळवादाचे एक उदाहरण आहे. यामुळे चिनी समाजामध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढत असून चिनी समाज आत्मचिंतनाकडे वळू लागला आहे. चिनी समाजात दुसरी पत्नी असणे हे सर्वमान्य होत चालले आहे. हे प्रमाण इतके वाढत चालले आहे की चीनच्या अर्थव्यवस्थेत मालमत्तांच्या किमती वाढण्यामागे दुसरा विवाह हा घटक कारणीभूत असल्याचे प्रसारमाध्यमे सांगत आहेत.

अनेक शहरांतील काही ठिकाणे अपार्टमेंटमधील फ्लॅट दुसऱ्या पत्नीला दिल्यामुळे बदनाम झालेले आहेत. या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलांचे घरभाडे व त्यांचा मासिक खर्च त्यांचे प्रियकर देत असतात. हा प्रकार केवळ व्यावसायिक वर्गात नाही, तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भ्रष्टाचारविरोधात मोहीम हाती घेतली होती, या मोहिमेत नोकरशाहीत काम करणारे कर्मचारीही दुसरे लग्न करत असल्याचे दिसून आले आहे. माजी रेल्वेमंत्री लिऊ िजजुन यांचे १८ महिलांशी संबंध असल्याचे आढळून आले होते.

चीनमध्ये विवाहबाह्य संबंधांचा इतिहास प्राचीन आहे. त्या काळी धनवान पुरुष अनेक विवाह करत असत, पण त्यांचे अन्य महिलांशीही संबंध असत. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून वेश्याव्यवसायाकडे कायम दुर्लक्ष केले गेले. याउलट महिलांमध्ये पतिव्रता होण्याची इच्छा अधिक असे; पण १९५० मध्ये स्त्रियांनी अविवाहित असणे व त्यांनी विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा मानला गेला. ८० च्या दशकापर्यंत विवाहबाह्य संबंध न ठेवण्याकडे समाजाचा कल होता; पण गेल्या ३० वर्षांत सेक्सविषयक नैतिक मूल्ये गळून पडल्याने तरुण वर्ग अनेक संबंध ठेवू लागला आहे.

यू फेंग यांच्यासारखे व्यावसायिक सल्ले देणारे विवाहबाह्य संबंध अक्षम्य गुन्हा मानत नाही, पण अनेक सर्व्हे असे सांगतात की, विवाहबाह्य संबंध हा चिनी समाजाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी ३८ लाख घटस्फोट झाले. ही संख्या गेल्या दशकापेक्षा दुप्पट आहे.

चीनमध्ये घटस्फोटांचे वार्षिक प्रमाण प्रति हजार २.८ इतके आहे. अमेरिकेत हे प्रमाण ३.२ आहे, पण युरोपपेक्षा चीनमधील घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. घटस्फोटांच्या वाढत्या कारणामध्ये आणखी एक मुद्दा आहे की, चीनच्या कायद्याने विवाहबाह्य संबंधांतून उत्पन्न झालेल्या संततीवर अन्याय केला आहे, तरीही चिनी समाजात घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. २०१५मध्ये पेकिंग विद्यापीठाने ८० हजार जणांचा सर्व्हे केला होता. त्यातील २० टक्के स्त्री-पुरुषांनी आपले विवाहबाह्य संबंध असल्याचे कबूल केले होते.

आर्थिक विकासामुळे व्यक्तीच्या जगण्याच्या आशा-आकांक्षा बदलत जात असून आर्थिक स्वातंत्र्यामुळे घटस्फोटांमध्ये वाढ होत असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. समाजाच्या या बदलत्या प्रवाहाला सोशल मीडियाही जबाबदार आहे.
बातम्या आणखी आहेत...