आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धीरुभाई अंबानींची थोरली सून; पिते सोन्याच्या कपात चहा, वापरते दीड कोटींची बॅग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानींचा आज (28 डिसेंबर) 83वा वाढदिवस आहे. धीरुभाईंनी अथक परिश्रमातून रिलायन्स समुहाला आकार दिला. सुरुवातीला भाड्याच्या घरात त्यांनी आपला बिझनेस सुरु केला होता. छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून सुरु केलेला बिझनेस आज जगभरात पोहोचला आहे. धीरुभाईंचे थोरले चिरंजिव व देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व धाकटे चिरंजिव अनिल अंबानी हे दोघे यशस्वीपणे सांभाळत आहेत.

धीरुभाईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्याला धीरुभाई व त्यांच्या कुटुंबायांशी संबंधित रोचक गोष्टी घेऊन आलो आहे. धीरुभाईंची थोरली सून अर्थात मुकेश अंबानींची पत्नी नीता अंबानी या दररोज सोन्याच्या कपमध्ये चहा पितात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. अहो, इतकेच नव्हे, तर त्या सुमारे दीड कोटी रुपयांची बॅग वापरतात.

तीन लाखांचा चहा व दीड कोटींची बॅग
नीता अंबानी यांच्या किचनमध्ये दररोज तयार होणारा चहा देखील महागडा आहे. चहावर अंबानी कुटुंबाचा तीन लाख रुपये खर्च होतो. एका इंटरव्ह्यूमध्ये नीता यांनी सांगितले होते की, त्यांच्या दिवसाची सुरुवात त्या जपानमधील सर्वात पुरातन क्रॉकरी ब्रँड 'नोरिटेक'च्या कपातून चहा पिऊन करतात. नोरिटेक क्रॉकरीचे खास वैशिष्ट्ये असे की, कपला सोन्याची (गोल्ड) बॉर्डर दिलेली आहे. 50 कपच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. याचा अर्थ असा की, एका कपची किंमत तीन लाख रुपये आहे. याशिवाय नीता यांच्याकडे असलेल्या बॅगची किंमत जवळपास दीड कोटी (1.43) रुपये आहे. एखाद्या पार्टीत सहभागी होताना ही महागडी बॅग त्यांच्या हातात असते.

पुढील स्लाइडवर वाचा,नीता अंबानी ब्रॅंडेड वॉचच्या चाहत्या...
बातम्या आणखी आहेत...