आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंग बदलवून महिलेचा पुरुष झाला होता हा अब्जाधीश; वहिनीला असे अडकवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रसिद्ध व्‍यापारी आणि अब्जाधीश असलेले अजय मफतलाल यांचे मागील वर्षी मुंबईत निधन झाले. लिंग बदलवून महिलेचा पुरुष होणारे ते देशातील पहिले व्‍यक्‍ती होत. लग्‍नापूर्वी त्‍यांचे नाव अपर्णा होते. पुरुष झाल्‍यानंतर त्‍यांनी अजय हे नाव धारण केले.

नेहमी वादात राहिलेले अजय मफत‍लाल यांनी केवळ अब्जो रुपयांची मालमत्ताा हडपण्यासाठीच लिंग परिवर्तन केल्‍याचेही बोलले जाते. इतकेच नव्हे तर, त्‍यांनी त्‍यांची वहिनी शीतल मफतलाल हिला 100 कोटी रुपयांच्या पेन्टिंग्ज चोरी प्रकरणातही अडकवले होते.

कोणता होता मफतलाल यांचा उद्योग?
महाराष्‍ट्रात उद्योग क्षेत्रात मफतलाल फॅमिलीचे मोठे नाव आहे. योगेंद्र मफतलाल यांनी 'मफतलाल ग्रुप'ची स्‍थापना केली होती. या माध्‍यमातून ते प्रोसेसिंग केमिकल्स, टेक्सटाइल्स आणि इतर व्‍यवसाय करत होते. योगेेंंद्र व पत्‍नी माधुरी मफतलाल या दाम्पत्याला अतुल्य, अपर्णा, गायत्री, मालविका आणि कुंती हे अपत्‍य. यातील अपर्णा ही लिंग बदलवून अजय बनला. अतुल्यने दोन लग्‍न केले. त्‍यांच्‍या पहिल्‍या पत्नी नाव पायल तर दुसरीचे शीतल आहे. पायल आणि अतुल्य यांना वरुण आणि मारुश्का ही दोन मुले आहेत. या कुटुंबाकडे नेव्‍हीनॉन, मफतलाल डाइज अॅण्‍ड केमिकल्स, मिहिर टेक्सटाइल्स आणि प्राणसुखलाल अॅण्‍ड कंपनी अशा एकूूण चार कंपन्‍या आहेत. यातील काही बंद आहेत तर काहीचे विभाजन झाले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कोण आहेत शीतल मफतलाल?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...