आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींचे आलिशान \'एंटीलिया\' पुन्हा चर्चेत; वाचा काय आहे भानगड?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा आलिशान बंगला 'एंटीलिया' एकदा पुन्हा चर्चेत आला आहे. एंटीलियाशी संबंधित एका प्रकरणात हायकोर्टने वक्फ बोर्डासह इतर बचाव पक्षाला नोटिस बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते सहदाब पटेल यांनी दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी करताना न्या. व्ही.एम. कानडे व न्या.एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही नोटीस जारी केली आहे.

नेमकी काय आहे ही भानगड?
- एंटीलिया ज्या जमिनीवर बांधण्यात आले आहे, ती जमीन बाजारमुल्यापेक्षा कमी किमतीत विकण्यात आली असल्याचा आरोप देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्यावर आरोप करण्यात आहे.
- करीमभाई इब्राहिमभाई अनाथ आश्रमाने ही जमीन 2002 मध्ये 'एंटीलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड'ला फक्त 21.5 कोटी रुपयांत विकली होती.
- याचिकाकर्ते सहदाब पटेल यांची बाजू मांडणारे वकील जावेद अख्तर खान यांनी हायकोर्टात सांगितले की, 'एंटीलिया'ला दिलेली जमीन बेवारस मुलांच्या अनाथअाश्रमासाठी आरक्षित होती.
- या जमिनीचा व्यवहार नियमबाह्य आहे. जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात यावा, अशी मागणी जावेद अख्तर खान यांनी केली आहे. याचिकेत 'एंटीलिया'ला देण्यात आलेली ओसी व आयओडी रद्द करण्याबाबत कोर्टाला विनंती करण्यात आली आहे.
- दरम्यान, 2011 मध्ये तत्कालीन विधानसभेचे नेता विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी वक्फ बोर्डाची कोट्यवधींची जमीन कमी किमतीत विक्री झाल्याचा आरोप केला होता.
- दुसरीकडे, मुकेश अंबानी यांनी 'एंटीलिया'च्या जमिनीसंदर्भात करण्‍यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा...
> मुकेश व नीता यांच्या आकाशाला भिडणार्‍या 'एंटीलिया'मध्ये काम करतात 600 कर्मचारी
> एंटीलियाची किंमत किती?
> 160 वाहनांसाठी अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था
> एक खासगी चित्रपटगृह, हेल्थ क्लब, बॉलरूम, गेस्ट हाऊस, बगिचा, स्वीमिंग पूल, स्टुडिओ आणि बरंच काही....

बातम्या आणखी आहेत...