आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Mukesh Ambani Top Richest Person Forbes India

मुकेश अंबानी सलग नवव्यांदा सर्वाधिक श्रीमंत, बंसल बंधुही बनले अब्जाधीश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सलग नवव्यांदा देशातील श्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. 'फोर्ब्स इंडिया' या मासिकाने देशातील 100 धनाढ्य व्यक्तिंची यादी जाहीर केली आहे. टॉप 10 मध्ये अनेक नव्या चेहर्‍यांना स्थान मिळाले आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे तब्बल एकशे सत्तावीस हजार कोटी (18.9 अब्ज डॉलर) एवढी संपत्ती असल्याचे 'फोर्ब्स इंडिया'ने म्हटले आहे. यावेळी यादीत ई-कॉमर्स कंपनी 'फ्लिपकार्ट' कंपनीचे संचालक सचिन बन्सल आणि बिनी बन्सल यांचाही पहिल्यांदा समावेश करण्यात आला आहे. यंदा या यादीमध्ये 12 नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप संघवी हे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे 18 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. प्रसिद्ध उद्योगपती अजीज प्रेमझी हे तिसऱ्या स्थानी असून त्यांची 15.9 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. मात्र, मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी 13 व्या स्थानावरून घसरुन 29 व्या स्थानावर पो पोहोचले आहे. अनिल अंबानींकडे एकूण 2.9 अब्ज डॉलरची संपती आहे.

हे आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत...
उद्योपतीक्रमवारीसंपत्ती
मुकेश अंबानी0118.9 अब्ज डॉलर
दिलीप संघवी0218 अब्ज डॉलर
अजीम प्रेमजी0315.9 अब्ज डॉलर
हिंदूजा ब्रदर्स0414.8 अब्ज डॉलर
पल्लोनजी मिस्त्री0514.7 अब्ज डॉलर
शिव नाडर0612.9 अब्ज डॉलर
गोदरेज ग्रुप0711.4 अब्ज डॉलर
लक्ष्मी मित्तल0811.2 अब्ज डॉलर
सायरस पूनावाला097.9 अब्ज डॉलर
कुमार मंगलम बिर्ला107.8 अब्ज डॉलर