आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businesswomen Neeta Ambani Birthday Story In Marathi

सोन्याच्या कपमध्ये चहा पितात नीता अंबानी, वापरतात दीड कोटींची बॅग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी व बिझनेसवुमन नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी असलेल्या नीता यांचा थाटही तसाच असणार, यात शंकाच नको. नीता दररोज सोन्याच्या कपमध्ये चहा पितात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. इतकेच नव्हे, तर त्या सुमारे दीड कोटी रुपयांची बॅग वापरतात.

नीता यांच्या वाढदिवसानिर्मित आम्ही सुरू केलेल्या मालिकेत नीता अंबानींसह त्यांच्या कुटुंबाशी संबंधित खास माहिती घेवून आलो आहोत.

तीन लाखांचा चहा व दीड कोटींची बॅग
नीता अंबानी यांच्या किचनमध्ये दररोज तयार होणारा चहा देखील महागडा आहे. चहावर अंबानी कुटुंबाचा तीन लाख रुपये खर्च होतो. एका इंटरव्ह्यूमध्ये नीता यांनी सांगितले होते की, त्यांच्या दिवसाची सुरुवात त्या जपानमधील सर्वात पुरातन क्रॉकरी ब्रँड 'नोरिटेक'च्या कपातून चहा पिऊन करतात. नोरिटेक क्रॉकरीचे खास वैशिष्ट्ये असे की, कपला सोन्याची (गोल्ड) बॉर्डर दिलेली आहे. 50 कपच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. याचा अर्थ असा की, एका कपची किंमत तीन लाख रुपये आहे. याशिवाय नीता यांच्याकडे असलेल्या बॅगची किंमत जवळपास दीड कोटी (1.43) रुपये आहे. एखाद्या पार्टीत सहभागी होताना ही महागडी बॅग त्यांच्या हातात असते.

नीता अंबानी ब्रॅंडेड वॉचच्या चाहत्या...
नीता अंबानी ब्रँडेड वॉचच्या चाहत्या आहेत. त्यांच्याकडे बुल्गारी, कार्टियर, राडो, गुची, कॅल्व्हिन केलिन व फोसिल सारख्या ब्रॅंडेड वॉच कलेक्शन आहे. या सर्व ब्रँड्‍सच्या प्रत्येक वॉचची किंमत दीड ते दोन लाख रुपये आहे.

रिपीट होत नाही सॅन्डल...
नीता अंबानी यांना स्टायलिश फूटवेअरचीही आवड आहे. एका इं‍ग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांचे ड्रेस, सॅन्डल रिपीट होत नाही. नीता यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मी चू, पेलमोडा, मार्लिन ब्रँडचे जूती व सॅन्डल आहेत. या सर्व ब्रँड्‍सच्या सॅन्डलची सुरुवात एक लाख रुपयांच्या पुढे आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, बिझनेसवुमन नीता अंबानी यांचे स्टायलिश फोटोज....