आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीला होणार नाही प्रवाशांची लुट, नव्या एव्‍हिएशन पॉलिसीला मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - नव्या एव्‍हिएशन पॉलिसीला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. बुधवारी नरेंद्र मोदी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या बैठकीत याबाबत निर्णय घेण्‍यात आला. या नवीन धोरणानुसार प्रवाशांना एका तासाच्‍या प्रवासासाठी 2500 रुपयांपेक्षा अधिक बेसिक कॉस्ट आकारली जाणार नाही. त्यामुळे सणासुदीला आकारल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा भाड्यावर प्रतिबंध बसेल. त्याचा फायदा प्रवाशांना मिळेल. पण पैसे कमविण्याच्या दिवसांवर लगाम लागल्याने विमान कंपन्यांना मात्र आर्थिक लाभ होणार नाही. दरम्यान या निर्णयानंतर काही विमान कंपन्यांच्या शेअर्सचे भाव पडल्याचे दिसून आले आहे. नवीन धोरणात काय आहे विशेष...
- एयरलाइन्‍सला 2500 रुपयांपेक्षा जास्‍त कॉस्ट आकारण्याची गरज पडल्यास सरकार अनुदान देईल, असा उल्‍लेख या धोरणात आहे.
- 30 मिनीटांच्‍या प्रवासासाठी 1200 रुपयांपेक्षा अधिक कॉस्ट आकारता येणार नाही.
- लो कॉस्‍ट विमानतळांना चालना देण्‍यात येणार आहे.
- रिजनल एयरलाइंसकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
- देखभाल आणि दुरुस्तीची कामांकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.
नवीन कंपनींसाठी आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट सुरू करणे होईल सोयीचे..
- नवीन धोरणानुसार, नवीन कंपन्‍यांनाही आता आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट ऑपरेशन सुरू करणे सोपे होणार आहे. नवीन धोरणात शासनाने 5/20 हा नियम बदलून 0/20 असा केला आहे.
- आतापर्यंत अशाच कंपनी इंटरनॅशनल फ्लाइटची सर्व्‍हिस देऊ शकत होत्‍या, ज्‍या डोमेस्‍टिक मार्केटमध्‍ये 5 वर्षांपासून ऑपरेशनल आहेत. शिवाय ज्‍यांच्‍याकडे 20 एयरक्राफ्टची फ्लीट असेल.
- नवीन धोरणात 5 वर्षांची अट रद्द करण्यात आली आहे.
18 महिन्‍यांच्‍या चर्चेनंतर धोरण..
- मागील 18 महिन्‍यांमध्‍ये विविध बाबींवर विचार विनीमय, चर्चा करुन हे धोरण फायनल करण्‍यात आले आहे.
- शासनाने ऑक्‍टोंबर 2015 मध्‍ये ड्रॉफ्ट पॉलिसीला रिव्‍हाइज केली होती.
- सरकारला विश्वास आहे की, नवीन धोरणामुळे 2022 पर्यंत प्रत्‍येक वर्षी 30 कोटी तिकीटांची विक्री होईल.
- 2027 पर्यंत हा आकडा 50 कोटीपर्यंत पोहचू शकतो.
रिजनल कनेक्‍टिव्‍हिटी वाढवण्‍यावर जोर..
- नवीन पॉलिसीमध्‍ये रिजनल कनेक्टीव्‍हिटी वाढवण्‍यावर जोर देण्‍यात आला आहे.
- सरकारने एयरलाइंससाठी एक रिजनल कनेक्‍टिव्‍हिटी स्‍क्रीमचा प्रस्‍ताव ठेवला आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)