आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल इस्टेट बिल २०१५ ला कॅबिनेटची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कॅबिनेटने रिअल इस्टेट बिल २०१५ ला मंजुरी दिली आहे. यामुळेे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होईल, रिअल इस्टेटमधील व्यवहारात स्पष्टता येईल, वादविवादाचे निराकरण करण्यास मदत मिळेल आणि विविध प्रकल्प लवकरात लवकर सुरू होतील, असा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. आता हे बिल संसदेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली आहे. यामुळे देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात देशातील तसेच विदेशातील गुंतवणूक वाढेल, असे मत सरकारने व्यक्त केले आहे. यामुळे सरकारच्या "सर्वांसाठी घर' या योजनेला मदत मिळेल.
या अंतर्गत होणाऱ्या व्यवहाराचे नियमन करण्यासाठी राज्यांमध्ये प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. या प्राधिकरणाकडे विकासकाला नोंदणी करावी लागेल.
बातम्या आणखी आहेत...