आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Calico, Google’S Anti Aging Company, Announces New Research

तारुण्‍य अबाधित राहण्‍यासाठी Google चे संशोधन, 100 वर्षांचे मिळेल आयुष्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल 27 सप्‍टेंबर रोजी 17 वे वर्धापन दिन साजरा करीत आहे. या निमित्‍ताने गुगलने माणसं तरूण दिसावीत आणि दिर्घ आयुष्‍य जगावीत यासाठी औषधी तयार करीत आहे.
गुगलची स्‍थापना 4 सप्‍टेंबर 1989 मध्‍ये झाली होती. परंतु 2005 पासून गुगल आपले कार्यालयीन वर्धापन दिन 27 सप्‍टेंबर रोजी साजरा करते. गुगल अशा काही टेक्‍नॉलॉजीवर काम करीत आहे जे की, भविष्‍यात यूझर्सला खुप उपयोगी पडू शकते. गुगलने कोट्यवधी डॉलर हेल्‍थ केअर सेक्‍टरच्‍या प्रमुखाशी हातमिळवणी केलेली आहे. या सेक्‍टरमध्‍ये गुगल डायबिटीज आणि अँटी एजिंग क्षेत्रावर फोकस करणार आहे. यामुळे सर्वसामान्‍य लोकांची खूप मोठी चिंता दूर होणार आहे.
तरूण दिसण्‍यासाठी औषधीवर काम
गुगल बायोटेक व्‍हेंचर 'कॅलिको'च्‍या माध्‍यमातून अँटी थेरपीवर काम करत आहे. लवकर येणारे म्‍हातारपण आणि विविध प्रकारचे जडणारे आजार रोकण्‍यासाठी नवीन संशोधन करणे हा यामागचा उद्धेश आहे. माणसांना कमीत कमी 100 वर्ष आयुष्‍य जगण्‍यास मिळाले पाहिजे. असे कंपनीचे संस्‍थापक लेरी पेज यांनी सांगितले. 'कॅलिको'च्‍या माध्‍यमातून गुगलची नजर 300 कोटी डॉलरच्‍या अँटी एजिंग मार्केटवर आहे.
काय आहे कॅलिको
कॅलिको गुगलद्वारे स्‍थापन केलेली इंडिपेंडेन्‍ट रिसर्च बायोटेक कंपनी आहे. ही कंपनी सॅन फ्रान्सिसको, कॅलिफोर्नियामध्‍ये स्‍थायीक आहे. याची स्‍थापना 2013 मध्‍ये झाली. याचे सीईओ अमेरिकेतील उद्यो्गपती ऑर्थर डी लेविंसन आहे. कंपनीचा मुख्‍य उद्धेश माणसांचे आयुष्‍य वाढवणे हा आहे. कंपनीला कॅलिफोर्निया लाईफ नावानेही ओळखले जाते.
पुढील स्‍लाइडवर वाचा उर्वरित माहिती....