आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Call Drop: TRAI Asks Telcos To Start Compensating Users

‘कॉल ड्रॉप’पोटी कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी : ट्राय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉल ड्राॅपप्रकरणी नुकसान भरपाईच्या नियमावर अंमलबजावणी करावी, असे आदेश ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना आदेश दिले आहेत. मात्र, फक्त न्यायालयाने दिले तरच आपण नुकसान भरपाई देऊ असा पवित्रा कंपन्यांनी घेतला आहे.

नुकसान भरपाईचा नियम १ जानेवारीपासून लागू झाला असून कंपन्यांनी याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जानेवारीला होणार आहे. दरम्यान, ६ तारखेपर्यंत कोणत्याच कंपन्यांवर कारवाई करणार नसल्याचे ट्रायने म्हटले होते. १६ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या ट्रायच्या आदेशानुसार, प्रत्येक कॉल ड्रॉपवर कंपनीने ग्राहकाला १ रुपयाची नुकसान भरपाई द्यावी. तथापि, एका ग्राहकाला दिवसाकाठी कमाल ३ कॉल ड्रॉपची भरपाई मिळेल. कंपन्यांच्या "ऑस्पी' संघटनेचे सरचिटणीस अशोक सूद म्हणाले, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून न्यायालयाच्या आदेशानंतरच आम्ही नुकसानभरपाई देऊ.
ट्रायच्या आदेशास न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याचेही आम्हाला माहीत आहे. सेल्युलर ऑपरेटर्स संघटनेचे संचालक राजन एस. मॅथ्यूज यांनी सांगितले, ट्रायच्या आदेशावर अंमलबजावणी करण्यास सध्या कंपन्या राजी नाहीत. यात अनेक त्रुटी असून याबाबत न्यायालयास माहिती दिलेली आहे.

१०० टक्के कॉल ड्रॉप मुक्त नेटवर्क अशक्य
कंपन्या आणि त्यांच्या संघटनांनुसार, १०० टक्के कॉल ड्रॉप मुक्त नेटवर्क देणे अशक्य आहे, हे माहीत असूनही नुकसान भरपाईचा नियम बनवण्यात आला आहे. नुकसान भरपाईच्या रूपात कंपन्यांना वर्षाकाठी १ ते दीड हजार कोटी रुपये द्यावे लागतील. दरम्यान, यामुळे दूरसंचार क्षेत्रावर सुमारे ८०० कोटींचा बोजा पडेल, असा ट्रायचा निष्कर्ष आहे. कंपन्या नेटवर्कमध्ये सुधारणा करत नसल्याने कॉल ड्रॉप होत असल्याचा ट्रायचा दावा आहे