आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान्स एक्स्पोत पुण्याच्या "सीगल'ची जाहिरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दरवर्षी फ्रान्समधील कान्स येथे भरणार्‍या आंतरराष्ट्रीय एसीटी रिस्पॉन्सिबल एक्स्पोमध्ये या वर्षी प्रदर्शित झालेली एकमेव भारतीय जाहिरात ही पुण्याच्या सीगल अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीने तयार केलेली आहे.

थरमॅक्स प्रोफेथर्मसाठी "पोलर बेअर' नावाने ही जाहिरात तयार करण्यात आली आहे. या एक्स्पोमध्ये ८८ देशांतील ११० जाहिरातींना स्थान देण्यात आले आहे. यात सीगलच्या एकमेव भारतीय जाहिरातीची निवड करण्यात आली आहे. छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये बर्‍याच वेळा कर्मचारी लाइट्स, पंखे, एसी बाहेर जाताना बंद करत नाहीत. अशा वेळी विजेचा अपव्यय होतो. थरमॅक्स कंपनीलासुद्धा ही समस्या भेडसावत होती. त्यामुळेच थरमॅक्समधील प्रोफेथर्म विभाग आणि सीगल अ‍ॅडव्हर्टायझिंग यांच्या संयुक्त चर्चेतून ही जाहिरात तयार
झाली आहे. प्लग पॉइंटच्या छिद्रांना उलटे करून पाहिल्यास ते पोलर बेअरसारखे दिसत असल्याने या जाहितीत पोलर बेअरचा वापर करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...