आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांबूंपासून निर्मित इथेनॉलवर धावणार कार, दोन वर्षांत उत्पादन सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बांबूंपासून तयार जैविक इंधन म्हणजेच इथेनॉलची लवकरच बाजारात विक्री सुरू होणार आहे. आसामच्या नुमालीगड रिफायनरीमध्ये सध्या या प्रकल्पावर काम सुरू असून फिनलंडच्या केमपोलिस या कंपनीचे तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे. नुमालीगड रिफायनरीने यासाठी केमपोलिसशी एक सामंजस्य करार केला आहे. याच अनुषंगाने फिनिश तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोमवारी रिफायनरीचा एक चमू फिनलंडसाठी रवाना झाला.
नुमालीगड रिफायनरीची निर्मिती भारत पेट्रोलियम, आॅइल इंडिया आणि आसाम सरकारच्या भागीदारीत करण्यात आली आहे. केमपोलिससोबत त्यांचा १ हजार कोटींचा प्रकल्प असून यात दरवर्षी सुमारे ४९ हजार टन इथेनॉलवर प्रक्रिया होईल. नव्या रिफायनरी दोन वर्षांमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. मका आणि ऊस आदींपासून अनेक वर्षांपासून इथेनॉल तयार केले जात आहे. मात्र, बांबूंपासून प्रथमच बनवला जाईल. फिनिश कंपनीसोबत २०१४ मध्ये करार करण्यात आला होता. मागच्या वर्षी या सरकारी कंपनीने अरुणाचल बांबू रिसोर्स डेव्हलपमेंट एजन्सीसोबत सामंजस्य करार केला होता. या करारानुसार रिफायनरी दरवर्षी ३ लाख टन बांबू खरेदी करणार आहे. नागालँडच्या बांबू विकास संस्थेनेही वार्षिक दोन लाख टन बांबू खरेदीसाठी करार केलेला आहे. आसामच्या कर्बी अंगलोंग आणि दमा हसाओसारख्या भागांत बांबूंचे घनदाट जंगल आहेत.
देशात गरजेपेक्षा निम्मे उत्पन्न
पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाची परवानगी आहे. मात्र, इथेनॉलच्या कमतरतेमुळे कंपन्या २ टक्केच ब्लेंडिंग करतात. १० टक्के मिश्रणासाठी कंपन्यांना दरवर्षी २६० कोटी लिटर इथेनॉल हवे. मात्र, देशात फक्त २५० कोटी लिटर इथेनॉलचेच उत्पादन होते.
तर इथेनॉल निर्मिती स्वस्त
मका उत्पादनात उर्वरकांचा उपयोग होतो. मात्र, बांबूंसाठी नाही. इथेनॉल बनवण्यासाठी विशेष जातीच्या बांबूंचा वापर होतो. शिवाय यास पडीक जमीनही चालते. वर्षांत त्याची तीन पिके घेता येतात.
पुढे वाचा, मक्याच्या तुलनेत ८ पट अधिक इथेनॉलनिर्मिती ..
बातम्या आणखी आहेत...