आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडियाच्या मदतीने करिअरमध्ये असे जाऊ शकता पुढे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याची पिढी साेशल मीडियाशी माेठ्या प्रमाणावर जुळलेली असून, त्यांचा कल याकडे अधिक असल्याचे दिसते. केवळ शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुण-तरुणीदेखील साेशल मीडियाशी वेगाने जुळत अाहेत. इंटरनेटचा वेगाने हाेणारा विस्तार याचे प्रमुख कारण अाहे. इंटरनेट व माेबाइल असाेसिएशन अाॅफ इंडियाच्या एका अहवालानुसार साेशल मीडियावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या माेठ्या प्रमाणावर अाहे. साेशल मीडियाचा वापर करणारे सुमारे ३३ टक्के युजर्स महाविद्यालयांत शिकणारे विद्यार्थी अाहेत. हे तरुण अागामी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य निश्चित करतील. 

साेशल मीडियाकडे शक्यताेवर मनाेरंजनाचे साधन म्हणूनच पाहिले जाते; परंतु अस्तित्व सिद्ध करू इच्छित असाल, तर कामाच्या ठिकाणी साेशल मीडियाच्या माध्यमातून करू शकता. 

नाेकरीच्या शाेधात मदत
अनेक कंपन्यांनी रिक्रूटमेंटमध्ये साेशल मीडियाचे महत्त्व मान्य केले अाहे. हल्ली अनेक कंपन्यांच्या रिक्रूटमेंटच्या प्रक्रियेत साेशल मीडिया हा महत्त्वाचा भाग असल्याचे दिसून येते. याचा फायदा सध्याच्या पिढीला हाेईल. कारण याच्याशी जुळलेला हाच एक माेठा वर्ग अाहे. टि्वटर व लिंक्डइनशी जुळलेले सुमारे २० काेटी युजर्स याेग्य व चांगल्या नाेकरीच्या शाेधात अाहेत. 

त्याचप्रमाणे अनेक संस्था साेशल मीडियाचा वापर चांगले उमेदवार शाेधण्यासाठी व याच्याशी जुळण्यासाठी करतात. कर्मचारी नेटवर्कच्या माध्यमातून सर्वात जास्त अर्ज काेठून येतात, हे माहीत केले जाऊ शकते. तसेच यातूनच कर्मचाऱ्यांपर्यंत अावश्यक माहितीदेखील पाेहाेचवली जाऊ शकते.

मार्केटिंग व ब्रॅण्डिंगसाठी हाेऊ शकताे उपयाेग
साेशल मीडियाशी जुळणाऱ्यांची संख्या पाहून या माध्यमाचे मार्केटिंगसाठी एक चांगले माध्यम म्हणून महत्त्व अधाेरेखित झाले अाहे. जेव्हा-जेव्हा साेशल मीडियाचा उल्लेख हाेताे, तेव्हा-तेव्हा लिखित कंटेंट, व्हिडिअाे व व्हिज्युअल स्ट्रॅटेजीला सर्वश्रेष्ठ मानले जाते. 

अांत्रप्रेन्याेर याचा उपयाेग ग्राहकांशी जुळण्यासाठी करू शकता. यासाठी साेशल मीडियाच्या अकाउंट‌्सवर सातत्याने पाेस्ट टाकून, ब्लाॅगिंग-रिटर्न व व्हिज्युअल कंटेंट तयार करून ग्राहकांशी थेट जुळू शकतात. तुम्ही यासाठी यू-ट्यूब व गुगल अॅड्चाही वापर करू शकता. हल्ली व्यवसायासाठी साेशल मीडियाचा वापर वेगाने वाढत अाहे. 

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सामंजस्य ठेवणे 
साेशल मीडियाचा उपयाेग कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध वा सामंजस्य ठेवण्यासाठी केला जाऊ शकताे. कर्मचारी समूहांच्या माध्यमातून नवनवीन कल्पना शेअर करू शकता किंवा याचा अापल्या कामात एखाद्या सेतूसारखा उपयाेग करू शकता. व्हाॅट‌्सअॅप ग्रुप यासाठी माेठ्या प्रमाणावर सहायक ठरू शकताे.
- श्वेता रैना, हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या पदवीधर talerang.com च्या सीईअाे
बातम्या आणखी आहेत...