आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेअरी प्रकल्पांसाठी 10,881 कोटी रुपयांना केंद्राची मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेअरी प्रक्रिया आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी स्वतंत्र निधीला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. दहा वर्षांत यासाठी १०,८८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत दूध खरेदी करण्यासाठी प्रभावी प्रणाली विकसित करणे, दूध थंड ठेवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे आणि दुधातील भेसळ ओळखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरण लावण्यात येणार आहे. यामध्ये सध्या असलेल्या सुविधांचाही विस्तार करण्यात येणार आहे.  वर्ष २०२८ - २९ पर्यंत नाबार्डमार्फत ८,००४ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. नाबार्डच्या वतीने चालू आर्थिक वर्षात २००४ कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात ३,००६ कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे स्वस्तातील कर्ज १२ वर्षांसाठी असेल यावर वार्षिक ६.५ टक्के व्याज घेण्यात येणार आहे. कर्ज परतफेड करण्याची प्रक्रिया दोन वर्षांनंतर सुरू होईल. त्यासाठी नाबार्डला १२ वर्षात ८६४ कोटी रुपये दिले जातील.  तसेच  बीएसएनएलच्या मोबाइल टाॅवर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...