आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरांमध्ये आहे टॉप बिझनेसमन्सची बंगले, प्रॉपर्टीच्या किमती कोटींमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशातील गर्भश्रीमंत लोक, बडे उद्योगपती कुठे राहातात. त्यांच्या बंगल्यांची किंमत किती असेल? ते कोणत्या शहरात राहातात ? असे प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडले असावेत. आज आम्ही आपल्यासाठी देशातील टॉप बिझनेसमनच्या ठावठिकाण्याविषयी माहिती घेवून आलो आहे.

राजधानीतील या भागात राहातात उद्योगपती
दिल्‍ली हे देशाच्या राजधानीचे शहर आहे. बड्या उद्योगपतींचे हे आवडते शहर आहे. दिल्‍लीत लुटियन झोनने देखील आपले वेगळे महत्त्व ठिकवून ठेवले आहे. येथे बहुतांश धनाढ्य उद्योगपती राहातात. याशिवाय दिल्‍लीत एपीजे अब्‍दुल कलाम मार्ग देखील खास आहे. या मार्गाला आधी औरंगजेब मार्ग असे म्हटले जाते होते. या भागातही अनेक बड्या उद्योगपतींची निवासस्थाने आहेत. या भागात प्रॉपर्टीच्या किमती कोटींच्या घरात आहेत. बंगल्यांच्या किमतीचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. जमिनीचे दर प्रति स्‍क्‍वेयर यार्ड 929688 रुपये आहे. (एक यार्ड म्हणजे नऊ स्‍क्‍वेयर फूट)

एपीजे अब्‍दुल कलाम मार्गवर राहातात हे उद्योगपती...
रियल्‍टी कंपनी डीएलएफचे चेयरमन के.पी. सिंह, जिंदल स्‍टीलचे एमडी नवीन जिंदल, मॅक्‍स इंडियाचे चेअरमन अनलजीत सिंह सारखे नामी उद्योगपतींचे बंगले एपीजे अब्‍दुल कलाम मार्गवर आहेत.

अमृता शेरगिल मार्ग
दिल्‍लीत एपीजे अब्‍दुल कलाम मार्गनंतर अमृता शेरगिल मार्ग श्रीमंतांची दुसरी पसंत आहे. या मार्गवर देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी एअरटेलचे मालक सुनिल भारती मित्तल, बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला, एम्मार एमजीएफचे एमडी श्रवण गुप्ता व बीपीटीपीचे एमडी काबुल चावला राहातात. अमृता शेरगिल मार्गवर प्रॉपर्टीचे दर 1134021 रुपये प्रती स्‍क्‍वेयर यार्ड आहे.

पुढील स्‍लाइडवर दिल्‍लीतील चाणक्‍यपुरीत आहेत या उद्योगपतींचे बंगले...
(टीप: छायाचित्रांचा वापर केवळ प्रस्तुतीसाठी करण्‍यात वाला आहे.)