आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्या खिशातली 2000 रुपयांची नवी नोट \'असली की नकली\' कसे ओळखाल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला देशाला संबोधित केलेल्या भाषणादरम्यान 500, 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्याची अचानक घोषणा केली. या निर्णयाने संपूर्ण देश हादरला. त्यानंतर देशभरात नव्या नोटा मिळवण्यासाठी लोकांची सुरु झालेली धावपळ तुम्ही पाहिली असेलच. धक्कादायक म्हणजे आता देशात बनावट नोटा छापणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

हैदराबादेत रविवारी पोलिसांनी 2000 नोटा छपाई करणार्‍या 6 जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 2000च्या 2 लाखाच्या नोटा जप्त केल्या. तसेच 2 कलर झेरॉक्स मशीन देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान बॉर्डरजवळील तरनतारन येथून भिखीविंडमध्ये या टोळीने 2000च्या बनावट नोटा बाजारात आणल्या आहेत. या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. पंजाब पोलिसांनी 2000 च्या 5 बनावट नोटा, एक स्कॅनर आणि कंप्युटर जप्त केले आहे. अहमदाबादेत देखील एका पान दुकानावाल्याला 2000 ची बनावट नोट मिळाली आहे.

या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहे. ती म्हणजे, 2000 ची नोट खरी आणि खोटी कशी ओळखावे?

पुढील स्लाइडवर क्लिक करून इन्फोग्राफिक्समधून पाहा, 2000 ची नोट खरी आणि खोटी कशी ओळखावे?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...