आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Market Crashes And Sensex Plunges 500 Points. Latest News

चीन संकटात: भारतीय शेअर बाजाराच्या एकूण गुंतवणुकीच्या दुप्पट फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ग्रीसमध्ये आलेल्या आर्थिक संकटाचा परिणाम आता जगभरातील इतर अर्थव्यवस्थांवरही दिसत आहे. चीनचे स्टॉक मार्केट बुधवारी उघडताच 8 टक्क्यांनी झपकण खाली आले. त्यानंतर काही क्षणांतच रेडिंग थांबवण्यात आले आहे.

चीनी शेअर मार्केटमध्ये मागील महिन्यात आलेल्या आर्थिक संकटामुळे तीन आठवड्यात गुंतवणुकदारांना तीन ट्रिलियन डॉलर्स अर्थात सुमारे 19 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. चीनमधील हे नुकसान भारतीय शेअर बाजारातील एकूण गुंतवणुकीच्या दुप्पट आणि ग्रीसच्या 2014 मधील एकूण जीडीपीच्या दहापट जास्त आहे. शांघाय स्टॉक एक्स्चेंज कॉम्पोझिट 5.9 टक्क्याने खाली सरकत बंद झाला. दरम्यान, गेल्या महिन्यापासून चीनी बाजारात सुरु असलेली पडझड थांबवण्यासाठी चीन सरकारचे प्रयत्न आहेत. परंतु, अद्याप काहीही फायदा झालेला नाही.

भारतीय बाजारावरही बुधवारीही ग्रीसमधील संकटाचा 'साइड इफेक्ट' दिसून आला. सेंसेक्सने 500 अंकांनी गडगडला तर निफ्टी देखील 8350 च्या खाली आला आहे.

युराेझाेनमधून बाहेर पडण्यासाठी घालण्यात अालेल्या अटी मान्य करण्यास ग्रीसने नकार दिल्यामुळे मंगळवारी देखील भारतीय शेअर बाजाराच्या प्रारंभीच्या सत्रात त्याचे पडसाद उमटून बाजार गडगडला होता. परंतु, नंतर खरेदीचा जाेर वाढल्यामुळे ग्रीसच्या संकटाची भीती दूर झाली. दुपारी उशिरा झालेल्या खरेदीत बाजारात सुधारणा हाेऊन सेन्सेक्समध्ये 115.97 अंकांची वाढ झाली होती.

जर्मनी, फ्रान्ससमोर संकट
ग्रीसला संकटात मदत करण्यात जर्मनीची महत्त्वाची भूमिका आहे. युरोझोनच्या देशांमध्ये जर्मनी सर्वात मोठा कर्ज देणारा देश आहे. जर्मनीने आतापर्यंत 57.23 अब्ज युरो दिले आहेत. तर फ्रान्सने 42.98 अब्ज युरोचे कर्ज दिले आहे. ग्रीसमधील मतदानानंतर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी चर्चा करून ग्रीक नागरिकांच्या मताचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर युरोझोनमधील अर्थमंत्र्यांचे प्रमुख जेरोन डिजस्सेबलॉम यांनी जनमताचा निकाल निराशाजनक असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी ग्रीसमधील आर्थिक संकटाचा परिणाम जर्मनी आणि फ्रान्सवर होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या कारणांमुळे सारखा गडगडतोय चीन बाजार...
> फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची (एफआयआय) अनुपस्थिती हे चीनमधील बाजारात आलेल्या घसरणीचे मोठे आणि प्रमुख कारण आहे. थॉमसन रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये विदेशी गुंतवणुकदारांची मार्केटमधील भागिदारी एक टक्क्यापेक्षाही कमी आहे तर भारतात हीच भागिदारी 25 टक्क्याच्या जवळपास आहे.
> शेअरची झपाट्याने होणारी विक्री. सरकारने ही विक्री थांबवण्यासाठी आतापर्यंंत अनेक प्रयत्न केले. एक्सचेंज फीसमध्ये कपात केली. इंटरेस्ट रेटही कमी केला. मात्र, कोणताही फायदा झाला नाही.
>गुंतवणुकदारांनी देखील बाजाराकडे पाठ फिरवली आहे. गुंतवणुकदार झपाट्याने मार्केटमधून बाहेर पडत आहेत. दरम्यान, 'अथॉरिटीज मार्जिन फायनेंसिंग'चे नियम फारच कडक आहेत. त्याचा परिणाम गुंतवणुकीवर दिसत आहे.
काय म्हणतात एक्‍सपर्ट...
चीनी बाजारावर कोसळलेले आर्थिक संकट म्हणजे एक बबल बर्स्ट (फुगा फुटणे) आहे, असे एक्सपर्ट्सनी म्हटले आहे. मागील एक वर्षात चीनची आर्थिक स्थिती आणि धोरणात कोणताही बदल झालेला दिसत नाही. त्या तुलनेत मात्र चीनचा बाजार झपाट्याने विकसित झाला आणि चीन जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये लिहिणारे मार्केट एक्सपर्ट डॅनियल डब्ल्यू ड्रेंजनर यांच्या मते चीनचे मार्केट व्हॅल्युएशनपेक्षा वास्तविक उत्पन्न जास्त आहे. याशिवाय अर्थिक विकास दर देखील कमी आहे.