आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी दराच्या विरोधात व्यापारी संघटनांचा बंद, देशभरातील15 व्यापारी संघटनांचा सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) एक जुलैपासून देशभरात लागू करण्याची तयारी सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, जीएसटी परिषदेने निश्चित केलेल्या विविध वस्तूंवरील कराला काही व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे.
 
या विरोधात देशभरातील जवळपास १५ व्यापारी संघटनांनी गुरुवारी बंद पुकारला होता. विशेष म्हणजे जीवनावश्यक वस्तूंना या बंद मधून वगळण्यात आले होते. देशातील विविध शहरांमध्ये कर दर कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आंदोलन करत या बंदात सहभाग नोंदवला. “पॅकेज फूड’ (पाकीटबंद अन्न पदार्थ) वर लावण्यात आलेल्या कराला या दरम्यान विरोध करण्यात आला असून या क्षेत्रालाही करात सूट देण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे.