आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन विमा खरेदीवेळी पाळायची पथ्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याचे युग ऑनलाइनचे आहे. या काळाला अनुसरून विमा कंपन्यांनीही ऑनलाइन विमा योजना खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सहजसुलभता आणि स्वस्ताईमुळे ऑनलाइन विमा खरेदीचा पर्याय लोकप्रिय झाला आहे. असे असले तरी ऑनलाइन विमा खरेदी करताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. ही पथ्ये कोणती हे आता जाणून घेऊ. विमा योजनांसाठी ऑनलाइन खरेदीचा पर्याय सोपा असला तरी सरसकट सर्व पॉलिसी या माध्यमातून खरेदी करता येत नाहीत. समजा एखाद्याचे वय ४५ आहे आणि विविध विकारांनी त्रस्त आहे, तर त्याला आरोग्य विमा योजना ऑनलाइन खरेदी करता येत नाही. आयुर्विम्याच्या बाबतीतही केवळ काही टर्म व युलिप योजनाच ऑनलाइन उपलब्ध आहेत.
किमतीचा पडताळा घ्या : ऑनलाइन विमा खरेदी करताना एका पॉलिसीच्या किमती दुसऱ्या पॉलिसीशी पडताळून पाहा. अॅग्रिगेटरच्या वेबसाइटवरील किमती आणि विमा कंपनीने दिलेल्या किमती तपासून पाहा. फरक असेल तर सखोल माहिती घ्या. अॅग्रिगेटरच्या वेबसाइटवरील माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. त्याऐवजी विमा कंपनीच्या मूळ वेबसाइटवर असलेल्या माहितीचा आधार घ्या.

प्रीमियममधील सवलत:
अनेक विमा पॉलिसीच्या प्रीमियमबाबत विविध अॅग्रिगेटरच्या वेबसाइटवर किमतीत फरक आढळतो. याचाच अर्थ प्रीमियम कमी होऊ शकतो. याचा फायदा ऑनलाइन विमा पॉलिसी खरेदीपूर्वी घ्या. तुलनात्मक अभ्यास करा, मग खरेदीचा निर्णय घ्या. पॉलिसी घेण्यापूर्वी त्यावर लागणाऱ्या सेवाकराबाबत माहिती घ्या. विमा योजनांवर १४ % सेवाकर लागतो हे पक्के लक्षात ठेवा.

ऑनलाइन खरेदी:
ऑनलाइन विमा खरेदी ऑनलाइन ब्रोकर, अॅग्रिगेटर वेबसाइट तसेच विमा कंपन्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. शक्यतो विमा कंपनीच्या मूळ वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करावी.