आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अाठड्यात बाजार गाठू शकतात खालची पातळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या अाठवड्यात निफ्टी ८७२ अंकांच्या महत्त्वपूर्ण अाधार पातळीच्या खाली बंद झाला नाही. ३० एप्रिल २०१५ राेजी दाेन वेळा या पातळीच्या खाली येऊन निफ्टी ८१८१.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला. इतक्या कष्टानंतरही निफ्टीने ८१४४.७५ अंकांची खालची पातळी गाठली; पण त्याच वेळी महत्त्वपूर्ण अाधार पातळी कायम राखली.निफ्टीमधील उसळीचा हा एक चांगला संकेत हाेता. त्यामुळे साेमवारी निफ्टीमध्ये १५० अंकांनी तेजी अाली.

अाता शेअर बाजारातील घसरण थांबली अाहे की निफ्टी पुन्हा एकदा घसरण्याची शक्यता अाहे, असा प्रश्न पडताे. माझ्या विश्लेषणानुसार अाताही घसरणीचे सत्र थांबलेले नाही. येणा-या दिवसांमध्ये अाणखी घसरण बघायला मिळू शकते. परंतु काही दिवशी तेजीचा माहाेलही राहील. अमेरिकेतील शेअर बाजारात शुक्रवारी माेठ्या प्रमाणावर तेजी अाली हाेती. ही तेजी साेमवारी भारतीय शेअर बाजारासाठी महत्त्वपूर्ण ठरली. अमेरिकेमध्ये एप्रिलमधील अाकडेवारी चांगली हाेती. तेथील अर्थव्यवस्थेला पहिल्या तिमाहीतील नरमाईच्या निकालातून बाहेर काढण्याचे संकेत मानले जातात . अाणि याची पुष्टी िमळाली ती साेमवारी अमेरिकेत जाहीर झालेल्या उत्पादन क्षेत्राच्या अाकडेवारीने. मार्चमध्ये अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रात अाठ टक्क्यांनी वाढ झाली, जी महिन्यातील सर्वाधिक वाढ हाेती. दुस-या बाजूला लाेकसभेत २०१५-१६ वर्षासाठी वित्त विधेयक संमत झाल्यामुळे स्थानिक बाजारात मजबुतीचे वातावरण निर्माण झाले. गमतीचा भाग असा की, साेमवारी बाजारात अालेल्या तेजीने चीनकडून येत असलेल्या बातम्यांकडे दुर्लक्ष केले. कारण चीनमधील अर्थव्यवस्थेत नरमाई येण्याचे संकेत अाहेत अाणि चीन साेडून जागतिक पातळीवर मात्र सकारात्मक वातावरण कायम राहिले.
स्थानिक शेअर बाजारात पुन्हा एकदा काॅन्साॅलिडेशन हाेण्याची शक्यता दिसत अाहे. या अाठवड्यात निफ्टी ८५०० ते ८११२ अंकांच्या पातळीत राहण्याची शक्यता अाहे. निफ्टीला वरच्या पातळीवर पहिला प्रतिकार ८३६६ अंकांच्या अासपास िमळेल. त्यानंतर या पातळीवर काहीसे काॅन्साॅलिडेशन बघायला िमळू शकते. िनफ्टीने ही पातळी पार केली तर पुढचा प्रतिकार ८४६३ ते ८५०० अंकांच्या पातळीवर असेल. ८५०० अंकांची ही प्रतिकार पातळी हा वरचा स्तर अाहे.

िनफ्टीला खालच्या स्तरावर पहिला अाधार ८२९७ अंकांच्या अासपास िमळेल. हा एक मध्यम परंतु महत्त्वाचा अाधार असेल. नफ्टी त्याही खालच्या पातळीवर येऊन बंद झाला तर त्यात काहीशी नरमाई बघायला िमळेल. अशा िस्थतीत िनफ्टीला पुढची अाधार पातळी ८२६२ अंकांच्या अासपास िमळेल. याच्या खालच्या पातळीवर येऊन िनफ्टीचे बंद हाेणे म्हणजे मंदीच्या वर्तुळात येण्याचे संकेत असतील. अशा िस्थतीत येणा-या िदवसांमध्ये िनफ्टीमध्ये अाणखी घसरण येऊ शकते. त्यानंतर िनफ्टीची पुढची अाधार पातळी ८१७२-८१४५ च्या पातळीत असेल. त्यानंतर ८११२ अंकांच्या अासपास िनफ्टीला माेठा अाधार िमळेल.

समभागांमध्ये या अाठवड्यात नेवेली लिग्नाइट अाणि हेवेल्स इंिडया चांगले वाटत अाहेत. नेवेली लिग्नाइटचा सध्याचा बंद भाव ७६.१० रुपये अाहे. पुढचे लक्ष्य ७९.५० रुपये अाणि स्टाॅप लाॅस ७२ रुपये अाहे. हेवेल्स इंडियाचा िवद्यमान बंद भाव २९१.२० रुपये अाहे. त्याचे पुढचे लक्ष्य २९८ रुपये अाणि स्टाॅप लाॅस २८३ रुपये अाहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in