आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील शेअर बाजार आता पडझडीच्या पकडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन आठवडे साचेबद्ध राहिल्यानंतर मंगळवारी देशातील शेअर बाजार पुन्हा एकदा खाली आला. यामागचे मुख्य कारण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट आहे. मंगळवारी पतधोरणाचा आढावा घेताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांनी ०.२५ टक्के रेपो रेट कमी केला आहे. मात्र, उर्वरित वर्षभराच्या स्थितीबाबत त्यांनी स्पष्ट खुलासा केला नाही. त्यांनी महागाईवर आरबीआयची बारीक नजर असल्याचीही चेतावणी दिली. त्यांच्या या वक्तव्यातून अनिश्चितता स्पष्ट जाणवत होती. ते म्हणाले की, मान्सून अपेक्षेपेक्षा कमी राहिला तर खाण्या-पिण्याच्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारपेठेत होत असलेल्या बदलांमुळे रुपयाचे मूल्य कमी होण्याची शक्यता आहे. ज्याचा सरळ परिणाम झाला आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर पडले. तसेच निफ्टी २.३४ टक्के पडून ८३०० च्यादेखील खाली येऊन बंद झाला.

आरबीआयच्या वतीने पतधोरणाच्या आढाव्यात भांडवलाच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या बँकांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय दिसले नाही. त्यामुळे बँकिंग शेअरबाबतच्या विश्वासावर परिणाम झाला. बँकिंग क्षेत्रातील लोकांच्या मते बँकांसाठी नगदी पैसा उभा करणे खूप आवश्यक होेते. कारण यामुळे बँक कर्ज स्वस्त करू शकल्या असत्या. तसेच त्याचा लाभ ते सरळ ग्राहकांपर्यंत पोहोचू शकले असते. आश्चर्याची बाब म्हणजे रपो रेट ०.२५ टक्के कमी करूनही बाजाराने त्याकडे लक्ष दिले नाही. कदाचित बाजाराने आधीच निर्णय घेतला असेल. एकूणच बाजार सर्व पातळ्यांवरील आधार स्तर तोडून खाली आला आणि पडझडीच्या पकडीत अडकला आहे.

जागतिक पातळीवर शेअर बाजारातील स्थिती एका विशिष्ट श्रेणीत बांधली गेली आहे. तरी देखील चीनच्या बाजारात वाढीची नोंद झाली आहे. तिथे बंेचमार्क सूचकांकामध्ये चांगली वाढ दिसून आली. अमेरिकेतील बाजारातील सकारात्मकता जागतिक बाजारपेठेतील स्थिती सुधारण्यासाठी मदतशीर ठरत आहे. मात्र, ग्रीस आणि डॉलरच्या मजबूत स्थितीबाबत कायम असलेल्या चिंतेने बाजारातील वाढ धिम्या गतीने होत आहे. टेक्निकल आणि स्थानिक बाजारात कमजोरी दिसून येत आहे. यात सध्या असलेल्या स्थितीमध्ये देखील पडझड पाहायला मिळण्याची शक्यता आहे. थोड्याफार प्रमाणात आधार मिळून निफ्टी ८१४५ अंकावर स्थिरावण्याची आशा आहे. मात्र, तरी देखील हा निफ्टीचा नीचांक असणार नाही. कारण यानंतर निफ्टीमध्ये पडझडीच्या शक्यतेबरोबर कन्सॉलिडेट असेल. अशा परिस्थितीत निफ्टीला पुढचा आधार ८०८८ अंकाच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे. हा देखील एक मध्यम आधार असेल. निफ्टीला मोठा आधार ७९९१ च्या जवळ मिळणार आहे, पण यावर देखील बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण निफ्टी यापेक्षा देखील खाली जाण्याची शक्यता आहे.

निफ्टीला वरती पहिला रेजिस्टेंस आधी सांगितल्याप्रमाणे ८२७८ च्या जवळपास मिळेल. जर निफ्टी चांगल्या व्हॉल्यूमसोबत या पातळीला पार करण्यास यशस्वी झाला तर पुढील महत्त्वूपर्ण रेजिस्टेंस ८३६३ अंकाच्या जवळ मिळेल. ही स्थिती कमी वेळात बाजारात सुधारणा होण्याचे संकेत असेल. शेअरमध्ये पुढील आठवड्यात अायडिया सेल्युलर लिमिटेड आणि हॅवेल्स इंडिया लिमिटेड चार्टवर चांगल्या स्थितीत दिसत आहेत. अायडिया सेल्युलरचा सध्याचा बंद भाव १७२.४५ रुपये आहे. त्यांचे पुढील लक्ष्य १७७ रुपये आणि कमीत कमी १६७ रुपये आहे. हॅवेल्स इंडियाचा सध्याचा भाव २७४.८० रुपये आहे, तर पुढील लक्ष्य २७९ रुपये आणि कमीत कमी २६८ रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in