आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीएसटी’वर अवलंबून असेल बाजाराचा मार्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात जीएसटी विधेयक राज्यसभेत मंजूर होण्याची अपेक्षा असल्याने भारतीय शेअर बाजारात मर्यादेत व्यवहार झाले. देशातील आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी जीएसटी विधेयक मंजूर होणे आवश्यक आहे. बुधवारी राज्यसभेत या विधेयकावरील चर्चेवर शेअर बाजाराचे बारीक लक्ष राहिले. जीएसटी मंजूर झाल्यानंतरही बाजारात तेजी दिसण्याची अपेक्षा नाही. कारण जीएसटी मंजुरीच्या अपेक्षेने येणारी तेजी बाजाराने आधीच मिळवली आहे, तर दुसरीकडे हवामान विभागाने मान्सूनदरम्यान सामान्यपेक्षा १०६ टक्के जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑटो कंपन्यांनीदेखील जुलै महिन्यात वाहन विक्रीत वाढ झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. यामुळे बाजारातील धारणा सकारात्मक झाली आहे. एकूणच सकारात्मकता कायम राहिल्यास पुढील काळात बाजारात तेजी दिसून येण्याची शक्यता आहे.
जागतिक पातळीवर बाजाराची धारणा सुस्त असून अमेरिका आणि चीनमध्ये आर्थिकदृष्ट्या नकारात्मकता कायम आहे. अमेरिकेचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) मध्ये दुसऱ्या तिमाहीत केवळ १.२ टक्क्यांच्या दराने वाढ झाली. आधी व्यक्त करण्यात आलेल्या २.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा हा आकडा खूपच कमी आहे. यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेबाबत साशंकता निर्माण झाली असून अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने लवकर व्याजदरात वाढ करणार नसल्याचे संकेत मिळत आहे.
एक खासगी व्यावसायिक सर्व्हे सोडल्यास इतर सर्वच सर्व्हेंतील आकडेवारी नकारात्मक आली आहे. चीनमध्ये विकासाची गती मंदावली असली तरी जुलै महिन्यात १७ महिन्यांनंतर पहिल्यांदाच उत्पादन क्षेत्रातील घडामोडींमध्ये वाढ नोंदवण्यात आल्याचे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तेजीने घसरण झाल्यामुळे बाजारात चिंता वाढली आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाचे दर एप्रिलच्या मध्यानंतर पहिल्यांदाच ४० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. त्यानंतर जागतिक पातळीवर पॉवर क्षेत्रातील स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. एकंदरीत मोठी सकारात्मक बातमी येण्याची अपेक्षा नसल्यामुळे जागतिक बाजारात मर्यादेत व्यवहार सुरू आहेत.
जीएसटीबाबत राज्यसभेत तसेच पुढील काळातील प्रगतीवर बाजारात चढ-उतार दिसण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या बाजारात मंदी असून निफ्टीला ८५७५ अंकांच्या पातळीवर चांगला आधार मिळण्याची अपेक्षा आहे. या स्थितीवर लक्ष ठेवावे लागणार आहे.
जर निफ्टी या पातळीच्या खाली आला तर बाजारात नफारूपी विक्रीची शक्यता वाढू शकते. अशा वेळी निफ्टी १०० अंकांनी घसरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निफ्टीला पुढचा मजबूत आधार ८४७९ च्या जवळपास मिळेल. जर निफ्टी ८५७५ पातळीच्याही वरती गेला तर बाजारात सकारात्मक धारणा तयार होऊ शकते. अशा स्थितीत याला पहिला रेझिस्टन्स ८७४८ च्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. त्यानंतर त्याला पहिला मजबूत रेझिस्टन्स ८८४५च्या जवळपास मिळेल. शेअरमध्ये या आठवड्यात जेएसडब्ल्यू स्टील आणि कोटक महिंद्रा बँक चांगल्या स्थितीत दिसत आहे. जेएसडब्ल्यू स्टीलचा सध्या बंद भाव १६७४.९० रुपये असून तो १६९८ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो, घसरणीत त्याला १६४७ वर स्टॉपलॉस लावावा, तर कोटक महिंद्रा बँकेचा सध्याचा बंद भाव ७६०.१० रुपये आहे. तो ७७५ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो, घसरणीत त्याला ७४७ रुपयांच्या पातळीवर स्टॉपलॉस लावावा.
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...