आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश एअरवेजविरोधात जिंकल्याने मिळालेले सहा कोटी व्हर्जिनच्या कर्मचाऱ्यांत वाटले हाेते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांनी व्हर्जिन अटलांटिकला ३३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी व्यवसायाची सुरुवात कशी केली ते  सांगितले. त्यांनी कशा पद्धतीने दिग्गजांचा सामना केला, कशा पद्धतीने आव्हाने स्वीकारली. ब्रिटिश एअरवेजच्या विरोधातील खटला जिंकल्यानंतर त्यांना मिळालेले ६ कोटी रुपये त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये वाटून दिले होते याचाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.  

रिचर्ड यांनी लिहिले की, “तो व्हर्जिन अटलांटिक आणि आमच्या चमूसाठी एक विशेष दिवस होता. तुम्ही सर्व अद्््भुत आहात. त्यामुळेच मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. तुम्हाला हे वाचून वेगळे वाटेल की, जितके माझे वय आहे त्याच्या अर्ध्याच्या बरोबरीची व्हर्जिन झाली आहे. मला तो दिवस चांगला आठवतो, ज्या वेळी सुरुवातीच्या काळात ब्रिटिश एअरवेजच्या लॉर्ड किंग यांनी आम्ही लवकर संपणार असल्याची भविष्यवाणी केली होती. ते म्हणायचे, उड्डयनाच्या या जगात आम्ही खूपच नवीन आहोत. मात्र, आम्ही त्यांना चुकीचे सिद्ध केले. गेल्या ३३ वर्षांत ज्यांनी “व्हर्जिन’मध्ये प्रवास केला त्यांना अालेला अनुभव कायम स्मरणात राहणारा ठरला. आम्ही या उद्योग क्षेत्राला बदलले आहे.’ ब्रॅन्सन यांनी लिहिले, “हे सर्व इतके सोपे नव्हते. आम्हाला ब्रिटिश एअरवेजच्या ‘डर्टी ट्रिक्स’ कॅम्पेनचा सामना करावा लागला. त्यांनी आम्हाला बिझनेसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.’

विचार करण्यासाठी दिवसभरात २० कप चहा पितात ब्रॅन्सन  
व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी ब्लॉगमध्ये सांगितले की, ते दिवसभरात २० कप चहा पितात. यामुळे मला ऊर्जा मिळते आणि चहा पिताना जो ब्रेक मिळतो त्यादरम्यान काहीतरी कल्पक विचार करू शकतात. यादरम्यान सहकाऱ्यांसोबत काही चर्चादेखील होते. यातून अनेक कल्पना मिळतात आणि ते सर्वदेखील त्यांचे म्हणणे माझ्यासमोर ठेवतात. ते सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करतात. त्यासाठी टेनिस खेळणे, सायकलिंग, जॉगिंग किंवा पतंगदेखील उडवतात. यामुळे उत्पादकता वाढत असल्याचा त्यांचा दावा आहे. ते लवकर उठून “ई-मेल’लाही उत्तर देतात. त्याचबरोबर जगभरातील कंपन्यांच्या सहकाऱ्यांशी कनेक्ट राहतात.
बातम्या आणखी आहेत...