आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राहकांना खुश करण्यासाठी रेस्तराँ बनवत आहेत प्रोफाइल, ऑस्ट्रेलियामधील बुकिंग साइटच्या वतीने एक लाख ग्राहकांचा डेटा सेव्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - सोशल मीडियाच्या या युगाचा पूर्ण फायदा मिळवण्याचा प्रयत्न रेस्तराँ करत आहेत. ऑस्ट्रेलियातील ऑनलाइन बुकिंग साइट डिम्मीच्या वतीने ग्राहकांचा डेटा लिंक्डइनच्या माध्यमातून जोडणे, हे त्याचे ताजे उदाहरण आहे. यामुळे रेस्तराँला ग्राहकांचा प्रोफाइल, डायनिंग हिस्ट्री आणि रोजगाराची स्थिती याची माहिती मिळते. विशेष म्हणजे आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त ग्राहकांनी आपला डेटा शेअर करण्याची परवानगी डिम्मीला दिलेली आहे.
डिम्मीचे स्टीव्हन प्रेम्युटिको यांनी सांगितले की, ग्राहक आधी कोणत्या रेस्तराँमध्ये गेलेले आहेत, त्यांना काय आवडते काय आवडत नाही याची माहिती आधीच मिळते. या प्रोफाइलमध्ये आम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. उदा. ग्राहक सर्वाधिक वेळा कोणती डिश ऑर्डर करतात किंवा मॅक्वेरी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १५ नंबरच्या टेबलवरच बसायला आवडते. तीच त्यांची आवडती जागा आहे. त्यांची रेस्तराँमधील भेट आठवणीत राहावी यासाठी हे सर्व करण्यात येत आहे, त्यांच्या वैयक्तिक माहितीशी आमचा संबंध नाही. गेल्या वर्षभरापासून ऑस्ट्रेलियामधील अनेक रेस्तराँनी ग्राहकांचा डेटा मग त्यामध्ये त्यांनी दिलेली ऑर्डर, खर्च यासारखी माहिती डिम्मीच्या माध्यमातून जमा केली आहे.इटालियन रेस्तराँ ओर्मेगियोच्या सहसंचालक अॅना पावोनी यांनी सांगितले की, या डेटामुळे आम्हाला खूपच मदत मिळत आहे. आम्ही ग्राहकांना वेगळ्या पद्धतीने सेवा देऊ शकत असल्याने आम्हाला ग्राहकीची चिंतादेखील राहिलेली नाही. कोणताही नवा ग्राहक आमच्यासाठी विशेष असतो, त्याच्यावर आम्ही छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. मग तो ग्राहक काय करतो किंवा त्यांची आधीची हिस्ट्री कशी आहे, याचा काहीही परिणाम होत नाही. डेटा जास्त असो किंवा कमी, त्याचा योग्य वापर झाला तरच त्याचा उपयोग आहे. ऑस्ट्रेलियामधील रेस्तराँ याचा योग्य वापर करत आहेत.

सिडनीतील इंडू आणि मेजिको रेस्तराँच्या मार्केटिंग संचालक केरोलिन ग्रोथ यांनी सांगितले की, त्या गेल्या काही महिन्यांपासून डिम्मीच्या सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत. डिम्मीला गेल्या वर्षी अमेरिकी ट्रॅव्हल दिग्गज ट्रिप अॅडव्हायझरने खरेदी केले होते. सध्या त्यांच्याकडे सुमारे १० लाख ग्राहकांचा डेटा आहे. २.५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी बुकिंग प्रोसेस केलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...