आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या पावसामुळे, वेळेआधीच कापूस लागवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २२ मेपर्यंत देशभरात ६.१२ लाख हेक्टर कापूस लागवड झाली आहे. वेळेआधीच ही लागवड झाली असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी यादरम्यान कापसाची लागवड झालेली नव्हती. मात्र, या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या पावसामुळे जमीन कापूस लागवडीसाठी तयार आहे.

गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळे कृषितज्ज्ञांनी या वर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाची लागवड जास्त झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी देशात कोणत्याच भागात २२ मेपर्यंत कापसाची लागवड झाली नव्हती. ती या वर्षी ६.१२ लाख हेक्टरपर्यंत पोहोचली आहे.

महाराष्ट्रातही लागवड
महाराष्ट्रदेखील कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांनी जमिनी तयारी करून ठेवल्या होत्या. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर कापसाची लागवड झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...