आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कूपन दुनिया\' देणार 200 रिटेल ब्रँडवर आकर्षक डि‍स्‍काउंट ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कूपनदुनिया' ही कूपन आणि डिस्‍काउंट ऑफर देणारी देशातील एक मोठी कंपनी आहे. ही कंपनी ऑफलाईन रिटेलमध्‍ये पदार्पण करत असून, 200 पेक्षा अधिक ब्रँडवर डिस्‍‍काउंट व एक्‍सक्‍लुसिव्ह ऑफर देत असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे. यात फॅशन, अॅपरल आणि एक्‍ससराईज, बेबी केअर, इलेक्‍ट्रॉनिक, स्‍पोर्टस, फुटवेअर, आणि होम डेकोरेशन सारख्‍या ब्रँडचा समावेश आहे.

या सहा शहरात ऑफर
मुंबई, दिल्‍ली, पुणे, बंगळुरु, अहमदाबाद, आणि चेन्नई या सहा शहरात ही कुपनदुनिया ऑफर देत आहे. सध्या अँड्रॉईड मोबाइलवर ही ऑफर सुरु असून ग्राहकांना 'कूपनदूनिया' कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. तसेच ही अॉफर आयओएस प्‍लॅटफार्मवरही सादर करण्‍यात येणा आहे.

'कुपनदुनिया' वर लिस्‍टेड बँड
कुपनदूनियाच्‍या प्‍लॅटफार्म लिस्‍टेड ब्रँडमध्‍ये किलर, लॉमेन, स्‍केचर्स, मार्क अँड स्‍पेंसर, कॅलविन क्लिन, बॉंबे डॉईंग आदी ब्रँडचा समावेश आहे. ब्रँडच्या दर्जानुसार प्रत्‍ये‍क ब्रँडचे वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत.

एक पाऊल पुढे...
कुपनदुनिया कंपनीने एक पाऊल पुढे टाकत जिओ फेसिंग फीचर सुरू करीत आहे, यामुळे युजर्सला शॉपिंग, मॉल, आणि रिटेल आउटलेटमध्‍ये बेस्‍ट डिल्‍स आणि डिस्‍काउंटबाबत माहिती मिळेल. ग्राहकाला खरेदी करतांना विविध पर्याय शिल्लक असल्याची माहिती देण्‍याचा कंपनीचा उद्देश आहे, या सोबतच युजर्सला डिल्‍स व कुपन सर्च करण्‍याची गरज पडणार नाही. या फीचरला लवकरच अँड्रॉईड आणि आयओएस प्‍लॅटफॉर्मवर लॉंच करण्‍यात येणार आहे.

कंपनीने काय सांगितले
भविष्‍यात भारतीय ई कॉमर्स वेबसाइटसाठी ग्रॉस मर्चंडाइज्‍ा व्‍हॅल्‍यूत कुपनदूनियेची भागिदारी दोन टक्‍के असेल, अश माहिती कुपनदुनियाच्‍या सीईओ अंकिता टंडन यांनी दिली. गेल्‍या वर्षी आम्‍ही फुड अँड ब्रेव्हरेज ऑफर लॉंच केली होती. यंदा इन स्‍टोअर डिस्काउंटमध्‍ये कंपनीने पाऊल ठेवल्याचे टंडन म्हणाल्या.