आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Grants Divorce To Samsung Chairmans Daughter

सॅमसंगच्या मालकाची कन्याही सुखी नाही; 17 वर्षानंतर घेतला घटस्फोट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय- :44
वडील: ली कुन ही
शिक्षण: योनसी विद्यापीठातून पदवीधर
कुटुंबीय: पती इम वू जाय, एक मुलगा
चर्चेत: 17 वर्षांच्या संसारानंतर त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे.

सॅमसंग कंपनीचे मालक ली कुन यांची थोरली कन्या ली बू जिन या वैवाहिक जीवनात सुखी नसल्याचे समोर आले आहे.

सार्वजनिक आयुष्यात ली बू जिन या यशस्वी असल्या तरी खासगी आयुष्यात त्यांच्या भावासारखीच अवस्था झाली आहे. भाऊ ली जे यंग यांचा घटस्फोट झाला असून धाकटी बहीण ली यूनने आत्महत्या केली आहे. 1995 मध्ये सॅमसंग फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात त्यांची वू जाय यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा जाय सॅमसंगमध्ये एका किरकोळ पदावर कार्यरत होते. परंतु, सध्या सॅमसंग इलेक्ट्रोमेकॅनिक्सचे ते उपाध्यक्ष आहेत. चार वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर 1999 मध्ये दोघांनी लग्न केले. वडिलांसह कुटुंबातील अनेक जणांचा जिनच्या या निर्णयास विरोध होता. द. कोरियात कुटुंबातील वृद्धांना खूप मान असतो. मागच्या वर्षी ली कुन जेव्हा पहिल्यांदा आजारी पडले, तेव्हाच त्यांनी 45 वर्षांपेक्षा मोठ्या मुलाकडे नेतृत्व सोपवले.

सॅमसंग समूहाचा आदरातिथ्य विभाग त्यांच्याकडे असून त्यातच हॉटेल शीलाचाही समावेश आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, खूप दयाळू आहेत ली बू...