आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीच्या 18 दिवसांनंतर या पाच क्षेत्रांतील स्थितीत अशी झाली सुधारणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्ली - ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद झाल्यानंतर व्यवहाराची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. सुरुवातीच्या दिवसांतील गोंधळानंतर आता लोकांच्या हातात जास्त पैसा येत आहे. रिटेल स्टोअर्स आणि मॉलमध्ये २० नोव्हेंबरनंतर लोकांची संख्या वाढली आहे. डिजिटल पेमेंट दुपटीपेक्षा जास्त झाले आहे, ५० टक्क्यांपेक्षा जास्त एटीएम रिकॅलिब्रेट झाले आहेत. त्याचा परिणाम बाजारावरही झाल्याचे दिसत आहे. मॉल-रिटेल स्टोअर्सशिवाय रेडिमेड कपडे, मोबाइल हँडसेट, ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रातील स्थिती वेगाने सामान्य होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

नोटबंदीनंतर सुरुवातीच्या आठवड्यात ग्राहकांच्या मागणीत एकदम घट झाली होती. आता अनेक क्षेत्रांत ८० टक्के सुधारणा झाली आहे. उद्योगांशी संबंधित लोकांनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर स्थिती आणखी सुधारेल. एक डिसेंबरनंतर अनेक बँका कर्ज दर कमी करण्याची घोषणा करतील. घर आणि इतर कामांसाठी दर घटण्याची प्रतीक्षा होत आहे. गावांत आणि लहान व्यापाऱ्यांची उधारी तिप्पट वाढली आहे. फिक्स्ड डिपॉझिटच्या दरात घसरणीनंतर सेवानिवृत्त आणि जमाकर्त्यांचे उत्पन्नही घटले आहे. सुमारे ९० टक्के लोक आपल्या डेबिट कार्डचा वापर एटीएममधून रोख काढण्यासाठी करत होते, पण आता कार्डधारकही आपली देणी कार्ड स्वॅप करून देत आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीत रोखीचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त होत होते तेही कॅश ऑन डिलेव्हरीऐवजी कार्ड ऑन डिलिव्हरीवर आले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) एमडी आणि सीईओ ए. पी. होता यांच्यानुसार, दररोज सुधारणा होत आहे. रुपे कार्डने व्यवहारात वाढ होत आहे. ई-कॉमर्स, मोबाइल आणि आधार कार्ड या डिजिटल माध्यमांतून बिल पेमेंट तिप्पट वाढले आहे. अशा प्रकारे क्रेडिट-डेबिट कार्ड स्वॅप करणाऱ्या पॉइंट ऑफ सेल (पॉस) मशीनने व्यवहार तिप्पट वाढले आहेत. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे सिनियर फेलो राजीव कुमार यांनी सांगितले की, एवढ्या दिवसांत दोनच गोष्टी सकारात्मक झाल्या. एनसीआरच्या मॉलमध्ये पुन्हा लोकांचे येणे वाढले आहे. रबीच्या पेरणीचे आकडे सामान्य आहेत. त्यामुळे किरकोळ महागाई नियंत्रणात राहील. खरा परिणाम अनुभवण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

नोटबंदीच्या घोषणेनंतर लगेच रिटेल स्टोअर्स आणि मॉलमध्ये ग्राहकांची संख्या घटली होती. फक्त दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंची विक्री होत होती. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी सांगतले की, परिस्थितीत सुधारणा झाली आहे, पण सामान्य दिवसांच्या तुलनेत अजूनही कमी आहे. आठ नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांनंतर व्यवसाय ३० टक्क्यांवर आला होता, पण २० नोव्हेंबरनंतर स्थिती बदलली. आता मॉल-मॉडर्न रिटेल स्टोअर्सवर ७० टक्के लोक येत आहेत. कपड्यांच्या दुकानात ८० टक्क्यांपर्यंत तर इलेक्ट्रॉनिकमध्ये ५० टक्क्यांपर्यंत विक्री आहे. बिग बाजारप्रमाणे इतर रिटेल चेनलाही दोन हजार रुपये देता आले पाहिजेत, यासाठी बँकांशी बोलणे सुरू आहे. त्याचबरोबर आम्ही आपल्या सदस्यांना मोबाइल अॅप आणि इतर डिजिटल माध्यमांच्या वापराचीही माहिती देत आहोत. वाढती थंडी आणि लग्नसराईमुळे कपडा आणि रेडिमेड कपडे व्यवसायात वेगाने स्थिती सुरळीत झाली आहे. मोबाइल हँडसेट बाजारातही रिकव्हरी दिसत आहे. केपीएमजीचे हेड ऑफ टॅक्स गिरीश बनवारी यांच्यानुसार, आपण थांबणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे. लोकांसोबतच सरकारलाही त्रास होत आहे. पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि इट्स कॅशचे एमडी नवीन सूर्या यांच्यानुसार, सर्वात सकारात्मक परिणाम हा झाला आहे की, देशात डिजिटल पेमेंटची सामान्य गती राहिती तर पुढील पाच वर्षांत जे झाले असते ते कमी वेळेत झाले आहे. आतापर्यंत जे व्यवहार रोखीत होत होते ते डिजिटल होत आहे. त्यामुळे धोका घटला आहे.

अॅसोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत म्हणाले की, सरकारने ज्या उद्देशासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला, त्याचे परिणाम यायला वेळ लागेल. सेवा क्षेत्र ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. वाहतूक, रिअल इस्टेट, हॉटेल, रेस्राँ, लहान कंपन्यांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला आहे. मजूर, फळ-भाजी विक्रेत्यांची उधारी वाढली आहे. क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी म्हणाले की, किमान दोन तिमाहीपर्यंत सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाने अर्थव्यवस्थेत नकारात्मक परिणाम राहील. भविष्यात मात्र याचा सकारात्मक परिणाम होईल.
पुढे वाचा.... कोणकोणत्या पाच क्षेत्रांतील स्थितीत झाली सुधारणा
बातम्या आणखी आहेत...