आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्त्रींची नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये धाव, रतन टाटांसह ग्रुपच्या विरोधात 4 कॅव्हेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टाटा ग्रुपच्या चेअरमन पदावरून हटवल्या गेल्यानंतर मंगळवारी सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा, टाटा ग्रुप आणि टाटा ट्रस्टसच्या विरोधात कॅव्हेट दाखल केले आहेत. नॅशनव कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) मध्ये त्यांनी एकूण 4 कॅव्हेट दाखल केले आहेत. मिस्त्री यांच्या गच्छंतीनंतर शापूरजी पालोनजी ग्रुपने कायदेशीर कारवाईच्या शक्यता फेटाळल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कॅव्हेट दाखल केले आहेत. कॅव्हेटचा अर्थ कोणताही आदेश देण्यापूर्वी कॅव्हेट दाखल करणाऱ्याची बाजू ऐकावी असा असतो.

टाटा सन्सनेही दाखल केले आहे कॅव्हेट..
- मिस्त्री यांनी रतन टाटा, टाटा सन्स, सर दोराबजी ट्रस्ट्स यांच्या विरोधात चारपैकी तीन कॅव्हेट दाखल केले आहेत.
- दुसरीकडे टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्याकडून कायदेशीर कारवाईत एकतर्फी निर्णय होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्ट, बॉम्बे हायकोर्ट आणि एनसीएलटीमध्ये कॅव्हेट दाखल केले आहेत.

13 कंपन्यांचे शेअर 4 टक्क्यांनी घसरले..
> या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम मंगळवारी शेअर मार्केटवरही पाहायला मिळाला आहे.
> मंगळवारी शेअर मार्केट सुरू होताच टाटा ग्रुपच्या 13 कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
> मंगळवारी व्यवसायात टाटा ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमधये 9017 कोटींची घसरण नोंदवण्यात आली आहे.
> मिस्त्री यांना सोमवारी टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. 8 लाख कोटींच्या टाटा ग्रुपने रतन टाटांना चार महिन्यांसाठी अंतरिम अध्यक्ष नियुक्त केले आहे.
> नवीन चेअरमनच्या नियुक्तीसाठी एक सर्च पॅनल तयार केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोण आहेत टाटा समुहाचे आजवरचे अध्यक्ष..
बातम्या आणखी आहेत...