आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरस यांचा 5 पानी मेल; मी तर नावालाच चेअरमन होतो; प्रतिनिधी पोस्टमनसारखे वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टाटा सन्सच्या चेअरमनपदावरील बडतर्फीनंतर सायरस मिस्त्री यांनी कंपनी बोर्ड रतन टाटांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, मी नामधारी चेअरमन होतो. ग्रुपमध्ये दुसरे एक शक्तिकेंद्र तयार झाले होते. टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी मंडळाच्या बैठकांत पोस्टमनसारखे वागत. बैठकीतून मध्येच उठून बाहेर जात टाटांच्या सूचना घेत असत. मिस्त्री यांनी बडतर्फीनंतर टाटाच्या बोर्ड सदस्यांना पाठवलेला पाच पानी मेल बुधवारी समोर आला. मिस्त्री यांच्या तोट्याबाबत स्पष्टीकरणावर सेबीने ग्रुपकडे खुलासा मागितला.
... टाटा ट्रस्टचा युक्तिवाद झाले ते वाईटच, पण दुसरा पर्यायच नव्हता
टाटा सन्समध्ये २८% वाटा असणारे दोराबजी टाटा ट्रस्टचे सदस्य व्ही.आर. मेहता म्हणाले, झाले ते योग्य नाही. पण, दुसरा पर्यायही नव्हता. मेहता म्हणाले...

> ग्रुप टीसीएस जेएलआरवर विसंबून होता. त्यामुळे कल्याणकारी कार्ये घटली. रतन टाटा ट्रस्टचे मिस्त्री टाटा सन्सचे चेअरमन होते. मात्र, ट्रस्ट कंपनीतील संपर्क संपला होता.

> जपानी भागीदार डोकोमोसोबत कायदेशीर लढा द्यावा लागला. ही बाब टाटा ग्रुपच्या विरुद्ध आहे. वाद योग्य पद्धतीने मिटवता आला असता.

१.१८ लाख कोटी रु. बुडीत खात्यात
जेएलआरटेटली वगळता सर्व विदेशी संपादनातून कर्ज वाढले. ग्रुपचे १.१८ लाख कोटी रु. बुडीत

खात्यात जाऊ शकतात. या कंपन्यांची सर्वाधिक घसरण...
> टाटा ग्रुपचे मुख्यालय बॉम्बे हाऊसमधून बाहेर पडल्यावर सायरस यांना बुधवारी प्रसारमाध्यमांनी गराडा घातला. त्यामुळे सायरस काहीसे चिडले.
>टाटा मोटर्स: नॅनोकार तोट्यात आहे. मात्र, केवळ भावनिक कारणांमुळे हे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला जात नाही.
> पोलाद :युरोपातीलपोलाद प्रकल्पातून ग्रुपला १० अब्ज डॉलरचा (६७,००० कोटी रु.) फटका शक्य.
>हॉटेल :न्यूयॉर्कच्यापियरे हॉटेलच्या कराराच्या अटी पाहता तोट्याशिवाय त्यातून बाहेर पडणे कठीण आहे.
> टेलिकॉम: इंडोनेशियातीलस्वस्त कोळशाच्या आधारे मुंद्रासाठी बोली लावली. वर्षभरात दीड हजार कोटी रुपयांचा तोटा झाला.

बैठकीत झाले ते सांगू शकत नाही
चेअरमन करताना मोकळेपणाने काम करण्याची ग्वाही दिली. मात्र, कंपनीचे नियम (आर्टिकल्स ऑफ असोसिएशन) बदलले. २४ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत झाले ते सांगू शकत नाही. माझी प्रतिमा खराब झाली,तसे टाटा ग्रुपचे नावही डागाळले. हटवण्याआधी काही सांगण्याची संधी दिली नाही. बहुधा हे पहिले प्रकरण आहे.

रतन टाटांमुळेच एअरलाइन्समध्ये...
रतन टाटांमुळे ग्रुपला जबरदस्तीनेे एअरलाइन्स व्यवसायात उतरावे लागले. एअर एशिया सिंगापूर एअरलाइन्समधील करारापेक्षा जास्त भांडवल ओतावे लागले. न्यायवैद्यक तपासणीत २२ कोटींची फसवणूक उघड. वाईट कामगिरीमुळे बाजूला केले असे वाटत नाही. माझ्याविरुद्ध मत देणाऱ्या दोन संचालकांनी माझे कौतुक केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा,
संचालक मंडळ मिस्त्री यांच्यावर नाराज असण्याची 5 संभाव्य कारणे..
बातम्या आणखी आहेत...