आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dal : This Year Prices Increased 53%, And 20 Per Cent Expected To Increase

डाळी पुन्हा महागणार, चालू वर्षात ५३% वाढले भाव, आणखी २० टक्के वाढण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयात महाग होणे, साठा कमी होणे आणि उत्पादनात आलेल्या घटीमुळे या वर्षी डाळी ५३ टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. तूरडाळीच्या किमती तर सर्वाेच्च पातळीवर पोहोचल्या आहेत, तर हरभरा डाळीच्या किमतीदेखील गेल्या अडीच वर्षांतील सर्वात वरच्या पातळीवर गेल्या आहेत. उडीद, मूग डाळीदेखील यादरम्यान महाग झाल्या आहेत. पुरवठा कमी असल्याने डिसेंबरपर्यंत डाळींच्या किमती कमी होणे शक्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळात डाळींच्या किमतीत आणखी १५ ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
२०% वाढतील डाळींच्या किमती
दिल्लीतील डाळ निर्यातदार सुनील बलदेवा यांनी "दिव्य मराठी' नेटवर्कला सांगितले की, डाळींच्या किमती ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिल्लीच्या घाऊक बाजारात हरभरा डाळ ५६०० रुपये प्रतिक्विंटलच्या भावाने विक्री झाली. बलदेवा यांनी सांगितले की, आम्ही ज्या ठिकाणावरून हरभऱ्याची आयात करतो, तेथेदेखील या वर्षी कमी उत्पन्न होण्याची शक्यता आहे. यादरम्यान बाजारातही हरभऱ्याची मागणी वाढली आहे. ज्यामुळे किमती वाढण्यास मदत होत आहे. दिल्लीच्या बाजारात हरभरा डाळ ४७०० रुपये क्विंटलच्या भावाने विक्री झाली. याची किंमत येणाऱ्या काळात ५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊ शकते. तसे पाहिले तर हरभऱ्याची आधारभूत किंमत ३१७५ रुपये आहे.

सोमवारी म्यानमारवरून आलेल्या तूर डाळीच्या किमती सर्वोच्च १५५० ते १५७० डॉलर प्रतिटनावर गेल्या होत्या. यामुळे मंगळवारी अकोल्यात तूर डाळीचे भाव ५०० रुपयांनी वाढून १०,००० रुपये प्रतिक्विंटलवर गेले होते. मुंबईला लेमन तूर डाळ ९४१० रुपये प्रतिक्विंटलच्या भावाने विकली गेली. केडिया यांच्या मते, डाळींच्या किमती १० ते १५ टक्के आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशात हरभऱ्याच्या डाळीनंतर तूर डाळीची सर्वाधिक विक्री होते.
चार महिने भाव स्थिर
मुंबईतील मोठे डाळ व्यापारी दिलीप काबरा यांच्या मते, येणाऱ्या तीन ते चार महिन्यांत डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. डिसेंबरपर्यंत हरभरा डाळीची आवक कमी राहण्याची शक्यता आहे. देशात सध्या ६ ते ८ लाख टन हरभरा डाळीचा साठा शिल्लक असून मासिक विक्री ३.५ लाख टन आहे. डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियातून हरभऱ्याची आयात सुरू होईल. तोपर्यंत देशात हरभऱ्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असेल. तसेच उडीद, तूर आणि मसूर डाळीची आयात कमी होत असल्याचेही काबरा यांनी सांगितले.
तुरीचे उत्पादन कमी
अकोल्यातील डाळ व्यापारी दिनेश केडिया यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्यात खराब मान्सूनमुळे तुरीचे उत्पादन घटले आहे. हीच परिस्थिती देशातीलदेखील आहे, तर तुरीचे मुख्य उत्पादन क्षेत्र असलेल्या मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकमध्ये कमी पाऊस झाला आहे, तर विदर्भ आणि मध्य प्रदेशात अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त रुपयाचे झालेले अवमूल्यन आणि म्यानमारच्या बाजारात वाढत असलेल्या कडधान्यांच्या किमती यामुळेदेखील डाळींच्या किमतीवर परिणाम झाल्याचे मत केडिया यांनी व्यक्त केले.