आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Darjeeling's Makaibari Tea, Which Price Rs 1.11 Lakh Per Kg

'मकाईबारी टी': भारतातील सगळ्यात महागडा चहा ब्रँड, 1.11 लाख रुपये किलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'मकाईबारी टी' हा भारतातील सर्वात महागडा चहा ब्रॅंड आहे. 1.11 लाख रुपये प्रति किलोने हा चहा विकला जातो. दार्जिलिंगमधील मकाईबारी फॅक्टरीत या चहाची निर्मिती केली जाते. 'मकाईबारी' ही जगातील पहिली चहाची फॅक्टरी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

जगभरातील लोक 'मकाईबारी टी'चे चाहते आहेत. उल्लेखनिय म्हणजे मकाईबारी फॅक्टरीचा चहा आता दुबईतही मिळणार आहे. दुबईतील फूड चेन 'बतील'सोबत ही कंपनीचा लवकरच करार करणार आहे. पुढील महिन्यात दोन्ही कंपन्यांमध्ये करार होणे अपेक्षित आहे. दुबईत प्रीमियम क्वॉलिटी असलेल्या चहाची मागणी लक्षात घेता कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललले आहे.
जगातील सगळ्यात जुनी टी फॅक्टरी 'मकाईबारी'
'मकाईबारी टी' इस्टेटची स्थापना 1859 मध्ये झाली होती. जगातील पहिली टी फॅक्टरी म्हणूनही 'मकाईबारी'चे नाव आहे. जी.सी. बॅनर्जी यांनी ही फॅक्टरी सुरु केली होती. आज या फॅक्टरीचा कारभार बॅनर्जी यांची चौथी पीढी सांभाळत आहे. दार्जिलिंगमधील टी-गार्डनमधून चहाची पाने निवडून अनेक प्रॉडक्टची निर्मिती केली जाते. कंपनीचे काम पाहाणारे स्वराज कुमार बॅनर्जी उर्फ राजा बॅनर्जी यांनी नुकतीच आपल्या भागिदारीतील 90 टक्के हिस्सा 'लक्ष्मी टी ग्रुप'ला विकला आहे.
कंपनीच्या नावावरून पडले 'मकाईबारी टी' हे नाव
'मकाईबारी टी' हे नाव कंपनीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 'मकाईबारी टी' हा ब्रॅंड जगभरात प्रसिद्ध आहे. जपान, ब्रिटन आणि अमेरिकेतील श्रीमंत लोक 'मकाईबारी टी'चे चाहते आहेत. चहाच्या वाढत्या मागणीमुळे 'मकाईबारी टी'ची बुकींग 1,850 डॉलर प्रति किलोच्या रेकॉर्ड किमतीवर पोहोचली आहे.
हे आहेत प्रॉडक्ट
> मकाईबारी टी
> सिल्व्हर टिप्स इम्पिरियल
> चहाचे हे प्रॉडक्ट, ग्रीन, व्हाइट, ब्लॅक आणि अन्य फ्लेवरमध्ये देखील मिळते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, दुबईत का वाढतोय चहाचा खप..?