आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज घेण्या-देण्याबाबतच्या प्रक्रियेत बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सीन रोजास एक मोठे घर विकत घेऊ इच्छित होते. ते त्यांचे जुने घर विकू शकत नव्हते. ते ठीक-ठाक करायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. मोठ्या व्याजामुळे त्यांना क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घ्यायचे नव्हते. तारणाशिवाय बँकेचे कर्ज घ्यायला त्यांना खूप वाट पाहावी लागली असती. तेव्हा ४३ वर्षीय रोजास यांनी एका वेबसाइटची मदत घेतली. ती कर्ज घेणारा आणि देणाऱ्यामध्ये सरळ संपर्क करते. तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर साइट तुमचा क्रेडिट स्कोअर पडताळेल. मिनिटांत तुमचा अर्ज पाहिला जाईल. व्याजदर ठरवेल. २५०पेक्षा अधिक लोकांनी रोजास यांना तीन वर्षांसाठी ८.९ टक्के वार्षिक व्याजदराने दहा लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला. रोजासचे म्हणणे आहे, कुठल्याही बँकेच्या तुलनेत हा अनुभव मानवीय आहे. सिलिकॉन व्हॅलीचे म्हणणे आहे की, लोक अशा प्रकारेच विचार करतील. पीयर टू पीयर लँडिंगच्या नावाने प्रसिद्ध अशी अनोखी कल्पना ५७० अब्ज रुपयांची बाजारपेठ बनली आहे. लँडिंग क्लब आणि प्रॉस्परसारख्या कंपन्या डिजिटल मध्यस्थाप्रमाणे काम करतात. त्या नफा कमावण्यासाठी कर्ज देणाऱ्या लोकांना गरजूंशी जोडतात. त्यांचे व्याजदर क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या व्याजदरापेक्षा कमी असतात. ते बचत खात्यापेक्षा जास्त व्याज देतात.
तसे, उधारीच्या व्यवसायात अनेक मोठ्या कंपन्या आपले बस्तान बसवू इच्छिता.विशालकाय कंपनी गोल्डमॅन सॉक्सने नुकतेच सांगितले की, अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून त्यांची छाेट्या ग्राहकांना सरळ कर्ज देण्याची योजना आहे. हेज फंड आणि कम्युनिटी बँक नेटवर्क पीयर टू पीयर देवाण-घेवाणीला क्षीण करू इच्छिता. क्रेडिट सुइसे आणि जेपी मोर्गन चेजने परंपरागत रिटेल लँडिंगचा धोका लक्षात घेता एका प्रमुख पीयर टू पीयर कंपनीमध्ये पैसे गुंतवले आहेत. मंदीमुळे पीयर टू पीयर देवाण-घेवाणीला चालना मिळाली आहे. परंपरागत बँकांनी हात अाखडते घेतल्याने ग्राहकांना पर्याय हवा होता. दुसरीकडे, नवीन सुविधेला टीकाकारांनी सावध केले आहे. एक आणखी आर्थिक संकट पीयर टू पीयर व्यावसायिकांना दिवाळखोर बनवतील. पैसे देणारे मागे हटतील. रॅफर्टी कॅपिटल मार्केट्सचे अॅनलिस्ट रिचर्ड बोवे यांचे म्हणणे आहे, हा विनाशाचा मार्ग आहे.

लँडिग क्लबला थारा देणाऱ्या क्लबमध्ये खाते खोलून बँकेद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतात. याला गुंतवणूक म्हणू शकतात. २५ डॉलरपर्यंत गुंतवणूक करू शकतात. याप्रकारे कर्जाची जोखीम अनेकांमध्ये विभागली जाते. २००६मध्ये स्थापन झाल्यानंतर लँडिंग क्लबने इन्व्हेस्टरला सरासरी ७.७९ टक्के वार्षिक परतावा दिला. दुसरीकडे, तीन वर्षांच्या सरकारी ट्रेझरी बॉण्डचा परतावा एक टक्का आहे. अमेरिकेचे माजी ट्रेझरी सेक्रेटरी लॅरी समर्सने टाइमला सांगितले, क्रेडिट कार्डावर कर्ज घेतल्यास १८ टक्के व्याज द्यावे लागते. निश्चितपणे हा योग्य मार्ग आहे. समर्स लँडिंग क्लबचे बोर्डाचे सदस्य आहेत.
वेगाने वाढणारा कारभार
लँडिंग क्लबने २०१५च्या पहिल्या तिमाहीत ६४ अब्ज रुपयांचे कर्ज वाटण्यात आले. २०१३च्या तुलनेत २६८ टक्क्यांची ही वाढ आहे.
प्रॉस्परला ६४ अब्ज रुपयांचा आकडा गाठायला आठ वर्षे लागली. कंपनीने २५० अब्ज रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...