आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीमुळे ३१ डिसेंबरपर्यंत एसएमएस बँकिंग मोफत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एसएमएसच्या माध्यमातून मिळणाऱ्या बँकिंग सुविधा ३१ डिसेंबरपर्यंत मोफत राहणार आहेत. या संदर्भात मंगळवारी दूरसंचार नियामक ट्रायने यासाठीचे शुल्क १.५० रुपयांवरून ५० पैसे करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर दूरसंचार कंपन्यांनी यासंबंधीच्या सर्व सेवा डिसेंबरपर्यंत पूर्णपणे मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा केली. म्हणजेच एक जानेवारी २०१७ पासून जमा रकमेची माहिती मिळवणे, पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणे यासारख्या सेवांवर फक्त ५० पैसे शुल्क लागेल. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा फीचर फोन वापरणाऱ्यांना होणार आहे. स्मार्टफोन युजर अॅपच्या माध्यमातून या सेवा वापरतात. देशात ६५% लोकांकडे फीचर फोन असल्याचे ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...