आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच चलनात येतील प्लास्टिक आणि पॉलिमर च्या नोटा, या 5 शहरात होऊ शकते फील्ड ट्रायल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदीच्या निर्णयानंतरही बनावट नोटा सापडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्लास्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी ही माहिती संसदेत दिली. नोटा चलनात आणण्यासाठी कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या 5 शहरांची निवड केली होती.पेपर नोटांच्या जागी प्लास्टिक नोटांचा प्रस्ताव आरबीआयने दिला होता का? या प्रश्नाला लोकसभेमध्ये उत्तर देताना मेघवाल यांनी सांगितले की, सरकारने प्लास्टिक आणि पॉलिमर आधारित नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक सर्व साहित्य खरेदी करण्यात आले आहे. रिझर्व्ह बॅंक या योजनेवर दोन वर्षांपासून संशोधन करत आहे. फील्ड ट्रायलनंतर प्लास्टिकच्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत.

फेब्रुवारी 2014 मध्ये तत्कालिन मनमोहन सिंग सरकारने प्रयोग म्हणून 10 रुपयांच्या एक अब्ज प्लास्टिकच्या नोटा छापून त्या देशातील 5 शहरात चलनात आणणार असल्याची घोषणा केली होती.

पुढील स्लाइडवर वाचा... प्लास्टिकच्या नोटांचे आयुष्य 5 वर्षे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...