Home »Business »Business Special» Decline In Sales Of IPhone Leads To CEO Tim Cook's Pay Slump

Apple अॅपल सीईअाे कुक यांचे वेतन कापले! 70 कोटी रुपयांऐवजी मिळतील 60 कोटी रुपये

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2017, 04:06 AM IST

लॉस एंजलिस- आयफोन निर्माती कंपनी अॅपलने २०१६ या वर्षात फोनविक्रीत पहिल्यांदाच घट आल्यामुळे सीईओ टीम कुक यांच्या पगारात १५ टक्के कपात केली आहे. या वर्षाचे विक्री उद्दिष्ट पूर्ण न होऊ शकल्यामुळे १५ वर्षांत पहिल्यांदाच कंपनीच्या महसुलात घट आली आहे. टीम कुक सर्वाधिक वेतन घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहेत.

कुक यांचे २०१५ मध्ये वार्षिक १०.३ दशलक्ष डॉलर(७० कोटी) वेतन होते. मात्र, उद्दिष्ट पूर्ण न झाल्यामुळे २०१६ मध्ये त्यांचे ते कमी करून ८.७ दशलक्ष डॉलर (६० कोटी) करण्यात आले. कॅलिफोर्निया येथील या कंपनीचा महसूल ८ % घटून सुमारे १५ लाख कोटी रुपये झाला. कंपनीचे खेळते भांडवल १६ टक्के घटून ६० अब्ज डॉलर(सुमारे ४ लाख कोटी रुपये) झाले. २००७ मध्ये आयफोनची विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच विक्री कमी होणे हे घसरणीमागचे मुख्य कारण आहे.

एवढेच नव्हे तर सन २००१ नंतर पहिल्यांदा अॅपलचा वार्षिक महसूलही कमी झाला आहे. त्याच वर्षी अॅपलचे संस्थापक व तत्कालीन सीईओ स्टीव्ही जॉब्स यांनी आयपॉड बाजारात आणला होता. या डिजिटल म्युझिक प्लेयरने आयफोन व आयपॅडसाठी पृष्ठभूमी तयार केली.

Apple ने हे सांगितले कारण...
- जगभरात iPhoneची विक्री मंदावल्याने अॅपलच्या नफ्यामध्ये घट झाली.
- Apple च्या महसूलात 8 टक्क्यांची (216 अब्ज डॉलर) घसरण झाली आहे.
- ऑपरेटींग नफ्यामध्ये 16 टक्के (60 अब्ज डॉलर) घसरण झाली.
- 2007 साली iPhone पहिल्यांदा बाजारात आला.
- 2001 नंतर पहिल्यांदाच Apple च्या उत्पन्नात घट झाली आहे.
- 1.3 कोटी अमेरिकन डॉलरवरुन टिम कूक यांचे वेतन 87 लाख अमेरिकन डॉलर एवढे करण्यात आले आहे.
- 2015-16 मध्ये टीम यांना 1.3 कोटी अमेरिकन डॉलर इतके वेतन होते.

पुढील स्लाइडवर वाचा, टीम कुक यांना केव्हा किती मिळाली सॅलरी?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended