आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरदार महिलांसाठी दिल्ली असुरक्षित, सिक्कीम सर्वोत्तम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिलांनी काम करण्याच्या दृष्टीने भारतात पूर्वोत्तर राज्य सिक्कीम पहिल्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली सर्वात असुरक्षित ठिकाण आहे. अमेरिकी संशोधन संस्था 'सेंट्रल फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’ (सीएसआयएस) आणि नाथन असोसिएट्सच्या वतीने अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यानुसार सिक्कीमला सर्वाधिक ४० अंक मिळाले आहेत, तर दिल्लीला सर्वात कमी ८.५ अंक मिळाले आहेत.
महिलांची भागीदारी पुरुषांएवढी झाल्यास १० वर्षांत जीडीपी १६ % वाढेल
क्रमवारी निश्चित करण्याचे ४ आधार
१.कारखान्यामध्ये आणि आयटी उद्योगात महिलांच्या कामाच्या तासावर राज्यांचे कायदेशीर निर्बंध.
२.लैंगिक शोषणासारख्या महिला कर्मचाऱ्यांवर परिणाम करणाऱ्या गुन्ह्याबाबत राज्याच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेची त्वरित प्रतिक्रिया.
३.एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत महिलांची टक्केवारी.
४.स्टार्टअप आणि औद्योगिक धोरणात महिला उद्योजकांना मिळणारे प्रोत्साहन.
भारतात महिला कार्यबलाची भागीदारी जगभरात सर्वात कमी (२४%) आहे. मॅकिन्से इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार भारतात महिलांची भागीदारी पुरुषांच्या बरोबरीत झाल्यास येत्या १० वर्षांत भारताच्या जीडीपीमध्ये १६ % वाढ होऊ शकते.
न्याय मिळण्याच्या बाबतीत दिल्ली मागे
काम करण्याच्या दृष्टीने सिक्कीम सर्वात पुढे आहे. यामुळे या राज्यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. अपेक्षित न्याय मिळण्याचा दर कमी असून महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळत नसल्याचे दिल्लीमधील निर्देशांक शेवटच्या स्थानावर आहे.
रात्री काम करण्यास ४ राज्यांत बंदी उठवली
४ राज्यांत सिक्कीम, कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडूने महिलांना रात्री काम करण्यासंबंधी सर्व बंदी उठवली आहे. यामध्ये सिक्कीम सोडल्यास ३ राज्यांनी हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानंतर घेतला आहे. महाराष्ट्रात किरकोळ दुकानांमध्ये फक्त १० वाजेपर्यंत काम करण्याची मुभा आहे.
>१५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात बिझनेस धोरणात महिला उद्योजकांना विशेष प्रोत्साहन मिळत नाही.
>९ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात आजही महिलांना रात्री कोणत्याच क्षेत्रात काम करण्यास परवानगी देत नाही.
बातम्या आणखी आहेत...