आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीडीपीवर नोटाबंदीचा परिणाम झाला, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने मंगळवारी जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा कोणताच परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला नसल्याचे मानले जात आहे. मात्र, असे असले तरी नोटाबंदीचा जीडीपी आकडेवारीवर परिणाम झाला असल्याची कबुली अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
 
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीमुळे भारतीय विकास दर मंदावला असून पुढील काळात यामध्ये आणखी तेजी येण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण क्षेत्राचा विचार केल्यास कृषी क्षेत्रातील वाढ तेजीने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.  
 
इंग्लंडचा दौरा करून अर्थमंत्री अरुण जेटली बुधवारी सकाळीच परत आले. जीडीपी आकडेवारीत पुढील काळातही आणखी सुधारणा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मार्च महिन्यापासून बाजारात नगदी वाढेल तसतशी आणखी स्थिती सुधारणा होण्याबाबत त्यांनी आशा व्यक्त केली.
 
बाजारात लवकरात लवकर चलन पुरवठा वाढवण्याबाबत सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थिती सामान्य असल्याचेही ते म्हणाले. मार्च महिन्यापासून बँकेतून नगदी काढण्याची मर्यादा वाढवण्यात येत आहे. यामुळे नगदी पैसे लवकरात लवकर लोकांच्या हातात पोहोचतील. याचाही परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे जेटली म्हणाले.  
बातम्या आणखी आहेत...