आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, करचुकवेगिरीला आळा; मुडीजचा अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटाबंदीमुळे करचुकवेगिरी, भ्रष्टाचाराला आळा बसला असून भारताच्या पतवाढीसाठी ही  सकारात्मक बाब असल्याचे निरीक्षण मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने आपल्या नोटाबंदीवरील अहवालात नोंदवले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत संवेदनशील असा अडचणींचा काळ आणि रोकड चणचणीचा काळ आता संपला असून ग्राहकी आणि गुंतवणुकीला आता चालना मिळेल, असे मत मुडीजने व्यक्त केले आहे. 
 
जानेवारी -मार्च या तिमाहीत मात्र देशाचा विकास दर ६.४ टक्के राहील, असेही मुडीजने स्पष्ट केले. यापूर्वी याच काळासाठी विकास दर ७ टक्के राहील, असा अंदाज मुडीजने वर्तवला होता. मुडीजच्या अहवालानुसार, नोटाबंदीचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक राहील. मध्यम कालावधीचा विचार केल्यास देशातील करचुकवेगिरी व भ्रष्टाचार कमी होऊन संस्थात्मक संरचना अधिक सशक्त होईल. देशातील आर्थिक व वित्तीय घटकांची विशिष्ट बांधणी झाल्याने करांचा पाया व्यापक होईल. त्यामुळे वित्तीय व्यवस्था विस्तारण्यास मदत होणार आहे. भारताचे पतमानांकन सुधारण्यास हे सर्व घटक हातभार लावणारे आहेत.
 
- पतमानांकनासाठी स्थिती सकारात्मक : मुडीज
- चणचणीचा काळ संपला, आता गुंतवणुकीला चालना
 
बातम्या आणखी आहेत...