आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ उद्योग जगताची ‘सीएं’वर जबाबदारी : मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जगभरातील गुंतवणूकदारांचा ओघ भारताकडे आहे. मात्र, उद्योगवाढीसाठी त्यांना पारदर्शक वातावरण देणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छ उद्योग जगत निर्माण करण्याची जबाबदारी चार्टर्ड अकाउंटवर (सीए) असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालाचा दाखला देत भारत हा चीनपेक्षा वेगाने विकास करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. शहरातील ‘आयसीएआय’ भवन येथे अायाेजित सीए फेस्टिव्हलच्या उद्््घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. ‘सन २०२० मध्ये जपानचे सरासरी आयुर्मान ४८ वर्षे, युरोपचे ४१, चीनचे ३९, तर अमेरिकेचे ३७ वर्षे असेल. मात्र, भारताचे २९ वर्षे राहणार आहे. भारताची तरुण लोकसंख्या हे देशाचे शक्तिस्थान असून सन २०२० मध्ये भारत हा सर्वात तरुण लोकसंख्येचा देश असेल. या तरुण मनुष्यबळाच्या आधारावर प्रशिक्षित व कौशल्य विकसित मनुष्यबळ पुरवणारा भारत सुपर पॉवर असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

गुंतवणूक क्षेत्रात ४० लाख कोटींच्या गुंतवणुकीची क्षमता असलेल्या उद्योग जगतात उद्योगांना पूरक व स्वच्छ वातावरणनिर्मितीची गरज आहे. ‘आयसीएआय’ ही संस्था कायद्याने स्थापित झाली असून उद्योजकांना कर्ज प्रस्तावापासून तर कर निर्धारणापर्यंत मदत करणारा, मार्गदर्शन करणारा सनदी लेखापाल हा उद्योजकाचा हात हातात घेणारा मित्र असतो. मात्र, अशा वेळी उद्योजकांना पारदर्शक व्यवहार करण्याचा सल्ला देत ‘सीए’ देशाच्या विकासासाठी भूमिका निभावू शकतो, असेही त्यांनी सांगितले. बँकांमध्ये फसवणुकीची प्रकरणे दाखल केली जातात. यामुुळे देशाची अर्थव्यवस्थादेखील धोक्यात अाली अाहे याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.