आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात सॅमसंग गॅलेक्सी नोट-७ वापरण्यावर बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय विमानसेवा नियामक मंडळाने (डीजीसीए) प्रवाशांना विमानात सॅमसंग गॅलेक्सी नोट-७ मोबाइल वापरण्याचे आदेश दिले आहेत. डीजीसीएने शुक्रवारी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सूचनेनुसार, विमानात सॅमसंग गॅलेक्सी नोट-७ सुरू किंवा चार्जही करता येणार नाही. शिवाय, तो चेक्ड बॅगेजमध्येही ठेवता येणार नाही. नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी नोट-७ मोबाइलच्या बॅटरी बिघाडामुळे त्यात स्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विमानसेवा कंपन्यांनी याचा धसका घेतला आहे. अशातच सॅमसंगने नुकतेच २५ लाख गॅलेक्सी नोट-७ मोबाइल परत मागवले आहेत. सिंगापूर, ऑस्ट्रेलियातील तीन विमानसेवा कंपन्यांनी या मोबाइलच्या विमानातील वापरावर आधीच बंदी घातली आहे.
बातम्या आणखी आहेत...