आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी भाड्याच्या घरात सुरु केला बिझनेस; मुलगा राहातो महागड्या बंगल्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धीरूभाई अंबानी देशातील प्रसिद्ध उद्योगपती होते. भाड्याच्या घरात त्यांनी आपला बिझनेस सुरु केला होता. छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून सुरु केलेला बिझनेस आज जगभरात पोहोचला आहे. धीरुभाईंचे थोरले चिरंजिव व देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व धाकटे चिरंजिव अनिल अंबानी हे दोघे यशस्वीपणे सांभाळत आहेत.

जोखिम स्विकारणारे उद्योजक म्हणून धीरुभाईंची गणना होत असे. मसाल्याचा व्यवसाय सुरु केल्यानंतर त्यांनी कापड उद्योगात पदार्पण केले. अंबानी कुटुंब हे देशातील रोल मॉडलपेक्षा कमी नाही. 28 डिसेंबरला धीरुभाईंचा वाढदिवस आहे. यानिमित्त आम्ही आपल्याला धीरुभाई व त्यांच्या कुटुंबायांशी संबंधित रोचक गोष्टी घेऊन आलो आहे.

धीरुभाईंचे थोरले चिरंजिव राहाता महागड्या बंगल्यात...
धीरुभाईंचे थोरले चिरंजिव अर्थात देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आकाशाला भिडणार्‍या 27 मजली 'एंटीलिया'मध्ये राहातात. एंटीलिया हा आलिशान बंगला मुंबईतील आल्टामाऊंट रस्त्यावर डौलात उभा आहे. घराची किंमत सुमारे 1 बिलियन डॉलर आहे. म्हणजेच 55 अब्ज रुपये. या घराचे नाव एका प्राचीन द्वीप यावरुन एंटिलिया ठेवण्यात आले आहे. घरात सिनेमागृहासह अनेक अद्ययावत सुविधा आहेत.

मुकेश अंबानी त्यांची पत्नी, तीन मुले आणि 600 कर्माचा-यांची या या महागड्या घरात राहण्याची सोय करण्यात आली आहे. या आलिशान महालात 160 वाहनांसाठी अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था आहे. जुन्या आणि नवीन वास्तुशैलींचा संगम ‘अँटिला’च्या बांधकामात साधण्यात आला आहे. एक खासगी चित्रपटगृह, हेल्थ क्लब, बॉलरूम, गेस्ट हाऊस, बगिचा, स्वीमिंग पूल, स्टुडिओसाठी वेगवेगळे मजले तयार करण्यात आले आहेत. या इमारतीत तीन हेलिपॅड आणि मल्टिपार्किंगचीही सुविधा आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 50 हजार रुपयांत सुरु केला होता बिझनेस...