आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल लॉकर सुविधा एक जुलैपासून, \'साइन अप\'साठी आधार क्रमांक आवश्यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजप सरकारची महत्त्वाकांशी 'डिजिटल लॉकर' सुविधा एक जुलैला लॉन्च होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या सुविधेचे उद्घाटन होणार आहे. देशातील नागरिकांना पॅन कार्ड, पासपोर्ट, गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र यासारखे महत्त्वपूर्ण दस्तऐवज डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे.

'साइन अप'साठी 'आधार क्रमांक आवश्यक
डिजिटल लॉकर उघडण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 'साइन अप' करावे लागेल. 'साइन अप' करण्‍यासाठी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आवश्यक असेल. ttps://digitallocker.gov.in या साइटवर जाऊन 'साइन अप' करता येईल. साइन इन करण्यासाठी तीन पर्याय उपस्थित राहातील.

1. OTP (वन टाइम पासवर्ड)
2. युजर नेम
3. सोशल मीडिया

'डिजिटल लॉकर'वर साइन इन करण्यासाठी आपल्याला वरील तीन पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागेल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अशा पद्धतीने होईल पेपरलेस वर्क....