आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्ष कर संकलनात जून तिमाहीत दाेन टक्के वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एप्रिल-जून २०१५ तिमाहीत देशातील प्रत्यक्ष कर संकलनात दाेन टक्के वाढ झाली. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या अाकडेवारीनुसार या तिमाहीत १.२८ लाख काेटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलन झाले. मागील वर्षी याच तिमाहीत १.२५ लाख काेटी कर संकलन झाले हाेते.
वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, कंपनी कर संकलनात दाेन टक्के वाढ झाल्याने प्रत्यक्ष कर संकलन वाढले. या काळात कंपनी कराच्या रुपात ६६१ अब्ज रुपये सरकारला मिळाले.