आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do You Know Who Is The Richest Chief Minister Of India, Here Is The List

देशातील टॉप-10 श्रीमंत मुख्यमंत्री, जाणून घ्या कोणाकडे किती संपत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्ली- देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अनेक श्रीमंत उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात गर्दी केली आहे. उमेदवारांनी आपापल्या प्रतिज्ञापत्रातून संपत्ती जाहीर केली आहे.

या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला देशातील धनाढ्य मुख्यमंत्र्याविषयी माहिती सांगणार आहे. या सर्व नेत्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. ही आकडेवारी एडीआरचा रिपोर्ट व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विवरणावर आधारित आहे.

जयललिता
- तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता जयराम यांचा कोट्यधीश मुख्यमंत्रींच्या यादीत अव्वल क्रमांक लागतो.
- 2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जयललिता यांनी दिलेल्या अॅसेट डिक्लरेशननुसार, त्यांच्याडे 117.13 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. दरम्यान, 2012 मध्ये त्यांच्याकडे 51.40 कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती.
- जयललिता या एआयएडीएमकेच्या महासचिव असून तमिळनाडूच्या सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान त्यांना प्राप्त केला आहे.
- राजकारणात येण्यापूर्वी जयललिता तमिळ सिनेमात अभिनेत्री होत्या.
- जयललिता यांनी तमिळसह तेलुगू, कन्‍नड व हिन्‍दी सिनेमातही काम केले होते.
जयललिता यांना राजकारणात आणण्याचे सर्व श्रेय एमजी रामचंद्रन यांना जाते.
- फिल्‍मी करिअरमध्ये एमजी रामचंद्रन व जयललिता ही सुपरहिट जोडी ठरली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, श्रीमंत मुख्यमंत्रीच्या शर्यतीत दुसर्‍या क्रमांकावर कोण?