आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Domestic Investment, Agri Still Challenges: FM Arun Jaitley

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी क्षेत्रातील परिस्थिती सरकारसमोर आव्हानात्मक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या वर्षभरात महागाई नियंत्रणाखाली येऊ शकेल, परंतु जागतिक अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्राची स्थिती त्याचप्रमाणे स्थानिक गुंतवणूक या गाेष्टी भारतीय अर्थव्यवस्थेला आव्हानात्मक ठरू शकतात, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. केंद्रातील नरेंद्र माेदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गेल्या वर्षभरात महागाई बर्‍याच प्रमाणामध्ये नियंत्रणात आली असून महागाईची एकूण स्थितीदेखील गेल्या एका दशकाच्या तुलनेत सुस्थितीत असल्याचा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी हाेण्यास मदत झाली आहे, परंतु सरकारनेदेखील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी याेग्य पावले उचलल्यामुळे घाऊक आणि किरकोळ महागाई ११ टक्क्यांच्या विक्रमी पातळीवरून खाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पेन्शन याेजनेची व्याप्ती वाढवणार
आर्थिक आघाडीवर काही क्षेत्रांत यश मिळालेले असले, तरी देशातील गुंतवणुकीचा आेघ वाढणे हे आव्हानात्मक आहे, परंतु जागतिक आर्थिक स्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेरची आहे, असेही जेटली म्हणाले. नजीकच्या काळात विमा संरक्षणात दुपटीपेक्षा जास्त वाढ करून ते ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगून जेटली पुढे म्हणाले की, आज देशाच्या ११ टक्के लाेकसंख्येकडे पेन्शन याेजना आहेत, परंतु अटल पेन्शन याेजनेच्या माध्यमातून देशात पेन्शनची व्याप्ती माेठ्या प्रमाणावर वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.