आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोंजी स्कीम्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार दिवसांपूर्वी सेबीने ठेवीदारांच्या हितासाठी देशात चालू असलेल्या सुमारे १९ बनावट योजनांविरोधात मोहिमा सुरू करून त्या बंद केल्या. अशा प्रकारच्या योजनांमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून रक्कम गोळा केली जाते; परंतु ठेवीदारांची फसवणूक होते. यालाच बनावट स्कीम्स म्हणतात.

तुमच्या मित्रांनी तुम्हाला अमुक योजनेत पैसा लावल्यानंतर काही महिन्यांत दुप्पट रक्कम मिळेल, असे कधी म्हटले आहे का? जर असे सांगितले असेल, तर ते खरे नाही, हे समजून चला. याच स्कीम्सना पोंजी स्कीम्स म्हटले जाते. गुंतवणूकदारांना धोका देणे असाच याचा अर्थ आहे. याला अशा प्रकारेच समजून घेतले जाते.
रणजित सार्वजनिक बांधकाम खात्यात कारकून आहे. पगारात त्याचा खर्च भागत नाही. एके दिवशी रणजितचा मित्र संजय त्याला सांगतो, एक जॅकपॉट चिट फंड स्कीम आलेली आहे. यात ६ महिन्यांत पैसे दामदुप्पट होतील. मित्राच्या सांगण्यावरून रणजित या योजनेत २० हजार रुपयांची गुंतवणूक करतो. त्याला अाशा असते की, ६ महिन्यांत ४० हजार मिळतील. तसेच घडते. त्याला ४० हजार रुपये मिळतात. त्या आनंदात तो पुन्हा ५० हजार रुपये गुंतवतो. त्याला माहिती असते की, सहा महिन्यांत आता एक लाख रुपये मिळतील. ६ महिन्यांनंतर तो त्या कार्यालयात जातो तेव्हा तेथे कोणीच नसते. दरवाजाला मोठे कुलूप लागलेले असते. तेव्हा कळते की आपली फसवणूक झाली आहे.

नाव कसे पडले?
चार्ल्स पोंजी नावावर फसवणूक करणाऱ्या योजनांना पोंजी स्कीम्स म्हटले जाते. चार्ल्स पोंजी इटालियन हाेता. त्याने अमेरिका आणि कॅनडातील लोकांना फसवले. गुंतवणूकदारांना त्याने पोस्टल रिप्लाय कुपनवर ४५ दिवसांत ५० टक्के फायदा मिळेल, असे सांगितले होते.
पोस्टल रिप्लाय कुपनचा वापर एखाद्या दुसऱ्या देशात संदेश पाठवण्यासाठी केला जातो. ज्या देशात आम्ही तो खरेदी करतो त्याचे मूल्य तेथील चलनात असते; परंतु ज्या देशात तो पाठवला जातो तेथे जास्तीच्या रकमेचा असू शकतो. जर अशा प्रकारे किमतीत फरक राहिला तर यापासून फायदा मिळवता येऊ शकतो. पोंजी स्कीम्समध्ये ४०० टक्के फायदा घेता येऊ शकतो. ट्रान्झॅक्शनचा खर्चच फायद्यापेक्षा जास्त असतो. तथापि, पोंजी अनेकदा एका मर्यादेपर्यंत परतावा जाहीर करते तितका देते. १९२० मध्ये या स्कीममुळे गुंतवणूकदारांना २ कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे. पोंजी स्कीममध्ये नव्या गुंतवणूकदारांना नेहमी दिलेल्या वायद्याप्रमाणे परतावा दिला जातो. जेव्हा नवे गुंतवणूकदार मिळत नाहीत किंवा गुंतवणूकदार पैसे परत मागतात, तेव्हा ही योजना बंद करण्यात येते.

पोंजी स्कीम्सची लक्षणे
पोंजी स्कीममध्ये या बाबी समान असतात.

विनाजोखमीचा परतावा - प्रत्येक गुंतवणुकीत जोखीम तर असतेच. ज्यामध्ये परतावा चांगला असतो त्यात जोखीम मोठी असते. तशात गॅरंटेड गुंतवणूक किंवा परताव्याच्या वायद्यावर थोडी साशंकता तर असलीच पाहिजे.

जास्त आणि सातत्याने परतावा- गुंतवणुकीच्या किमतीत चढ-उतार होत असतो. विशेषत्वाने कंपनी जेथे जास्त परतावा देत असेल, तेथे असे घडते. जर एखाद्या गुंतवणुकीत बाजारातील परिस्थिती वाईट
असेल, जर सातत्याने परतावा मिळतो आहे, तर तिकडे लक्ष देणे गरजेचे असते.

अनधिकृत लायसन्स सेलर - कायद्याप्रमाणे प्रोफेशनल आणि त्यांच्या फर्मला लायसन्स किंवा नोंदणी असली पाहिजे. बहुतांश पोंजी स्कीम्सकडे परवाना नसतो किंवा त्या नोंदणीकृत नसतात.

जटिल व्यूहरचना - जर तुम्हाला एखाद्या योजनेची माहिती नसेल, तर त्यापासून दूर राहिलेले बरे. अपूर्ण माहिती असेल, तर अशा स्कीममध्ये लेखी स्वरूपात माहिती दिली जात नाही.

रक्कम मिळण्यास अडचण - पोंजी स्कीम चालवणारे ठेवीदारांना सांगतात, आणखी पैसे गुंतवा. मग ते पहिल्यांदा गुंतवणूक करत असतील किंवा जुने गुंतवणूकदार असतील. त्यांना पाच प्रश्न तर विचारलेच पाहिजेत.

>स्कीम विकण्याचा परवाना आहे काय?
> इन्व्हेस्टमेंट नोंदणीकृत आहे काय?
> जोखमीची तुलना परताव्याशी कशी होते?
> तुम्हाला गुंतवणूक समजते का?
> मदत कुठपर्यंत मिळत असेल?

कायदा
जी कंपनी व्यवसायात येऊ पाहते ती कंपनी कायदा १९५६ नुसार नोंदणीकृत करावी लागते. भारतीय रिझर्व्ह बँक नॉनबँकिंग फायनान्सची नियामक आहे. यात कर्जे देणाऱ्या कंपन्या, इन्व्हेस्टमेंट देणाऱ्या कंपन्या, अॅसेट फायनान्स कंपन्या येतात. सेबीअंतर्गत लिस्टेड कंपन्याही येतात. याचबरोबर म्युच्युअल फंड आणि कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम्स येतात. सीआयएसच्या अधीन राहून प्लांटेशन आणि रिअल इस्टेट उपक्रमात पैसे घेतले जातात. एनबीएफसी डिपॉझिट्स घेते आहे, तर तिची नोंदणी रिझर्व्ह बँकेमध्ये नोंदणीकृत असली पाहिजे. रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित दरापेक्षा जास्तीचे व्याज अशा योजना देऊ शकत नाहीत.

(सहयोगी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन इन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, नवी दिल्ली)
बातम्या आणखी आहेत...