आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत तीन टक्के वाढेल ई-कॉमर्स, डिजिटल इंडियामुळे विस्ताराला मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील ई-कॉमर्स बाजार सध्या ४२ अब्ज डॉलर (२७९,३०० कोटी रुपये)चा आहे. दोन वर्षांत म्हणजेच २०१७ मध्ये तो तीन टक्क्यांनी वाढून १२८ अब्ज डाॅलर (८५१,२०० कोटी रुपये)चा होईल, अशी शक्यता उद्योग संघटना असाेचेमच्या वतीने डेलॉय सोबत केलेल्या एका अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटची उपलब्धता वाढणे, शिपिंग आणि पैसे भरण्याच्या चांगल्या पर्यायामुळे ई-कॉमर्स क्षेत्र वाढत असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे. तसेच कंपन्या ज्या गतीने गुंतवणूक वाढवत आहे किंवा दुसऱ्या कंपनीत समावेश किंवा अधिग्रहण करत आहेत, त्यामुळे देखील या क्षेत्रात तेजी येत आहे.

या क्षेत्रातील स्पर्धा तेजीने वाढत असल्याचे स्पष्ट करताना स्नॅपडील तथा साॅफ्टबँकेदरम्यान झालेला करार, फ्लिपकार्टच्या वतीने मिन्त्राचे अधिग्रहण, ओला कॅब्सच्या वतीने टॅक्सी फॉर श्योरचे अधिग्रहण आदींचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील मोबाइलचा वापरदेखील गतीने वाढत आहे. मोठ्या कंपन्यांच्या एकूण महसुलापैकी अर्धापेक्षा जास्त पैसा एम-कॉमर्स (मोबाइल कॉमर्स) च्या माध्यमातून येत असल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. त्यामुळे याकडे मोठ्या कंपन्या जास्त लक्ष देत आहेत. पुढील काळातदेखील या क्षेत्राच्या विकासात मोबाइल, सोशल मीडिया आणि भागीदारीमधील व्यावसायिक मॉडेलच्या माध्यमातून होईल.
कंपन्यांच्या वतीने ग्राहकांच्या खरेदीवर विशेष लक्ष देण्यात येत असून त्यांची अावड निवडीची माहिती घेऊन नवनवीन ऑफर तयार करण्यात येत आहे. सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे देखील ई-कॉमर्स बाजाराच्या विस्ताराला मदत होत आहे. यामुळे दुर्गम भागालादेखील इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जात आहे. या अभियानात १.१३ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता असल्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.
कर धोरणात अडचण
भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर खराब असल्यामुळे पुरवठा आणि लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापन करणे खूपच अवघड आहे. विविध व्यवसायाच्या पद्धती आणि प्रत्यक्ष व्यवहारावर लागणाऱ्या कराचे धोरण स्पष्ट नाही. विदेशातून होणाऱ्या ऑनलाइन खरेदीमुळे यातील समस्या अधिकच वाढल्या आहेत. यापासून सुटका करण्यासाठी वेगळ्या ई-कॉमर्स कायद्याची आवश्यकता आहे.
ऑनलाइन ७१% हिस्सा
भारतात असलेल्या एकूण ई-कॉमर्स बाजारात ऑनलाइन ट्रॅव्हलची भागीदारी जवळपास ७१ टक्के आहे. ऑनलाइन किरकोळ बाजारात आणखी वाढ होण्याच्या बऱ्याच संधी आहेत. एकूण किरकोळ व्यापार ५०० अब्ज डॉलरचा (३३.२५ लाख कोटी रुपये) आहे, ज्यात ई-कॉमर्सची भागीदारी फक्त १.६ अब्ज डॉलर (१०,६४० कोटी रुपये) आहे.
पुढील वर्षी ४ कोटी ग्राहक
देशातील ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या २०१३ मध्ये असलेल्या दोन कोटींवरून २०१५ मध्ये चार कोटींवर पोहाेचली आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकसंख्येत ७५ टक्के १५ ते ३४ वर्षे वयोगटातील तरुणांचा समावेश अाहे, जे सर्वात जास्त खरेदी करतात.
बातम्या आणखी आहेत...