आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट ई-वॉलेटमधून ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता बळावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटचे महत्त्व झपाट्याने वाढले, परंतु धोकाही तितक्याच प्रमाणात वाढला आहे. बहुतांशी बँकांनी त्यांचे ई-वॉलेट लाँच केले असून ते सायबर गुन्हेगारांचे ते लक्ष्य ठरत आहेत. अनेक गुन्हेगार बनावट ई-वॉलेट बनवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. सायबर सेक्युरिटी फर्म कॅस्परस्कीनुसार, आतापर्यंत मोठे प्रकरण समोर आले नसले तरी कुठल्याही अॅप स्टोरमध्ये बनावट ई-वॉलेट टाकण्याचा धोका वाढला आहे.   
कॅस्परस्की लॅबचे दक्षिण आशियातील व्यवस्थापकीय संचालक अल्ताफ हाल्दे यांच्यानुसार, डिजिटल पेमेंट कंपन्या त्यांच्या अॅपवर होणारा प्रत्येक व्यवहार सुरक्षित व्हावा म्हणून प्रयत्न करत असतात.  ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली जाते. परंतु सायबर गुन्हेगार खऱ्याखुऱ्या अॅपप्रमाणे अॅप स्टोरवर टाकू शकतात. अॅप डाऊनलोड करणाऱ्या व्यक्तीने काळजी घेतली नाही तर ते अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड होते. तसेच अॅपच्या माध्यमातून जो व्यवहार होतो तो अॅपला जोडलेल्या बँक अकाउंटमध्ये जातो.   

अल्ताफ म्हणाले की, डिजिटल पेमेंटमुळे अनेक फायदे मिळतात, पण त्याचा धोकाही तितकाच आहे. ग्राहकांनी याची माहिती ठेवणे गरजेचे आहे. अॅप डाऊनलोड करताना कुठले अॅप खरे आणि कुठला बनावट आहे हे जाणून घ्यायला हवे. उदा. अॅपचा लोगो दिसायला सारखा असू  शकतो, पण स्पेलिंगमध्ये थोडासा फरक जाणवेल.   
 
असा साधला जातो डाव
गुन्हेगार बनावट कागदपत्रांच्या आधारे अकाउंट उघडू शकतात. ई-वाॅलेटचा पैसा त्याच अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो. यात आपण अडकू नये म्हणून ठरावीक कालावधीनंतर ते दुसरे अकाउंट उघडू शकतात. ई-वॉलेटमध्ये पैसा जमा करण्याची मर्यादा राहत असल्यानेही नवीन अकाउंट उघडावे लागतात.  
 
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये वाढले डिजिटल व्यवहार  
नोटाबंदीनंतर नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान क्रेडिट-डेबिट कार्ड, रुपे कार्ड, यूपीआय आणि मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून व्यवहार करण्याचे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढले आहे.
 
९४,००४ कोटी रुपयांचे व्यवहार नोव्हेंबर २०१६ मध्ये डिजिटल मार्गाने झाले. १,०४,०५५   कोटी रुपयांचे व्यवहार डिसेंबर महिन्यात डिजिटल मार्गाने झाले   
 
१,३२० कोटींचे देण्या-घेण्याचे व्यवहार ५.९ कोटी ई-वॉलेट व्यवहारातून नोव्हेंबर २०१६ मध्येें
२,१३० कोटींचे देण्या-घेण्याचे व्यवहार ८.७८ कोटी व्यवहार डिसेंबर २०१६ मध्ये   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...