आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी गुंतवणुकीचे नियम अाणखी सुलभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -
अाशियातील तिसरी सर्वात माेठी अर्थव्यवस्था समजल्या जाणाऱ्या भारतामध्ये येणाऱ्या जागतिक भांडवलाला समान वागणूक देण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व वेगवेगळी वर्गवारी एकत्र करून कंपन्यांमध्ये हाेणाऱ्या विदेशी गुंतवणुकीचे नियम अाणखी सुलभ करण्याचा गुरुवारी निर्णय घेतला.

विदेशी थेट गुंतवणूक करणे अाणखी सुलभ व्हावे यादृष्टीने घेण्यात अालेला हा सर्वात महत्त्वाचा निर्णय अाहे. गुंतवणुकीचे नियम सुलभ करताना विदेशी थेट गुंतवणूक, विदेशी राेखासंग्रह गुंतवणूक अाणि अनिवासी भारतीयांनी केलेली गुंतवणूक या सर्वांसाठी असलेल्या वेगवेगळ्या नियमावलीएेवजी एकच नियमावली असेल असे जेटली यांनी सांिगतले. या अगाेदर विदेशी गुंतवणुकीसंदर्भात वेगवेगळ्या मर्यादा हाेत्या. देशातील गुंतवणूक अाणि राेजगाराला चालना मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात अाल्यानंतर वाणिज्य खात्याच्या अाैद्याेगिक प्राेत्साहन अाणि धाेरण खात्याने विदेशी गुंतवणुकीचे नियम अाणखी सुलभ करावेत, असा प्रस्ताव मांडला हाेता.
मर्यादा वाढवली
विदेशी गुंतवणुकीच्या नियमात सुधारणा करताना अाता अाैषध अाणि रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीला स्वयंचलित मार्गाने परवानगी देण्यात अाली असून त्यासाठी अधिकृत मंजुरीची गरज नाही. त्याचबराेबर विमा अाणि संरक्षण क्षेत्रामधील क्षेत्रीय विदेशी गुंतवणूक मर्यादादेखील ४९ टक्क्यांपर्यंत वाढवली अाहे. या मुळे येस बँक अाणि अॅक्सिस बँक यांना विदेशी मालकी मर्यादा ७४ टक्क्यांपर्यंत वाढवता येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...